जानेवारी महिन्यात येणारा मकर संक्रांत हा सर्वात मोठा सण आहे. हिंदू पंचांगानुसार पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशीला मकर संक्रांती सण सादला केला जातो. मकर संक्रांती यावेळी १४ जानेवारी (शुक्रवार) साजरी केली जाणार आहे. मात्र पंचांगातील काही वादामुळे काही ठिकाणी मकर संक्रांती १५ जानेवारीला साजरी केली जाणार आहे.ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. या स्थितीला मकर संक्रांती बोललं जातं. या दिवशी सूर्य दक्षिणायान से उत्तरायण होते. या दिवसापासून दिवस मोठा आणि रात्र छोटी होण्यास सुरुवात होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मकर संक्रांतीपासून शुभ कार्याला पुन्हा एकदा सुरूवात होते. मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान, पूजा आणि दान करण्याचे विशेष महत्त्व आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करताना अनेक वस्तूंचे दान केले जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी काही वस्तूंचे दान करणे खूप शुभ आणि फलदायी मानले जाते, जाणून घेऊयात.

  • संक्रांतीच्या दिवशी तीळ दान करण्याची परंपरा आहे. मकर संक्रांतीला शास्त्रामध्ये तील संक्रांती असेही म्हटले जाते. काळे तीळ आणि तिळापासून बनवलेल्या वस्तूंचे दान केल्याने पुण्य लाभते. विशेषतः शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी तिळाचे दान केले जाते. याशिवाय तिळाचे दान केल्याने सूर्यदेव आणि भगवान विष्णूही प्रसन्न होतात. मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ दान करण्यामागे एक कथा आहे, खरेतर शनिदेवाने आपल्या क्रोधित पिता सूर्यदेवाची पूजा करण्यासाठी काळ्या तिळाचा वापर केला होता. यावर प्रसन्न होऊन सूर्यदेवाने मकर राशीत आल्यावर तिळाचे पूजन करून तिळाचे दान करून प्रसन्न होईल असे वरदान दिले होते. या दिवशी तीळ दान केल्याने शनिदोषही दूर होतो.
  • मकर संक्रांतीला खिचडी असेही म्हणतात. या दिवशी खिचडी दान करून खिचडी बनवल्याने विशेष पुण्य प्राप्त होते. मकर संक्रांतीला तांदूळ आणि काळी उडीद डाळ खिचडीच्या स्वरूपात दान केली जाते. काळ्या उडदाचे दान केल्याने शनिदेव प्रसन्न होतात, त्यामुळे शनिदोष दूर होतो आणि तांदूळ दान केल्याने अक्षय फळ मिळते.
  • मकर संक्रांतीच्या दिवशी गुळाचे दान केल्याने आणि गुळापासून बनवलेल्या वस्तू खाल्ल्याने विशेष लाभ होतो. ज्योतिषशास्त्रात गुळाचा संबंध गुरू ग्रहाशी आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी गुळाचे दान केल्याने शनि, गुरु आणि सूर्य तिघेही प्रसन्न होतात.
  • मकर संक्रांतीला मीठ दान करण्याची प्रथा आहे. मीठ दान केल्याने विशेष लाभ होतो. मकर संक्रांतीच्या दिवशी मीठ दान केल्याने वाईट आणि वाईट शक्तींचा नाश होतो आणि तुमचा वाईट काळही टळतो, असे शास्त्रात सांगण्यात आले आहे. त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी मीठ दान करणे शुभ मानले जाते.
  • कुंडलीतील शनि आणि राहूचे दोष दूर करण्यासाठी मकर संक्रांतीच्या दिवशी लोकरीचे कपडे दान करणे देखील खूप शुभ मानले जाते. लोकरीचे कपडे, ब्लँकेट या दिवशी कोणत्याही गरीब गरजूला किंवा कोणत्याही आश्रमाला नक्कीच दान करावे.
  • मकर संक्रांतीच्या दिवशी देशी तूप आणि त्यापासून बनवलेल्या मिठाईचे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. तुपाचा संबंध गुरू आणि सूर्याशी आहे, या कारणास्तव मकर संक्रांतीला मान, कीर्ती आणि भौतिक सुविधा मिळण्यासाठी देशी तुपाचे दान केले जाते.
  • मकर संक्रांतीच्या दिवशी पक्ष्यांना धान्य खाऊ घालणे शुभ मानले जाते.
  • मकर संक्रातीच्या दिवशी गायीला हिरवा चारा खाऊ घातल्यास पुण्य मिळते.
  • मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा केल्यानंतर शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी तेलाचे दान करावे.
  • मकर संक्रांतीच्या दिवशी गंगेत स्नान केल्यानंतर गरिबांना रेवडी दान करणे खूप शुभ आहे.
  • मकर संक्रांतीच्या दिवशी गरीब आणि गरजूंना नवीन कपडे दान करावेत.
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Donate these 11 items to makar sankranti 2022 rmt