Jupiter Transit 2024: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह वेळोवेळी राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो. ज्यावेळी ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याला गोचर, मार्गी आणि वक्री असे म्हटले जाते. ग्रहांची वक्री स्थिती उलट गतीशी संबंधित असते. १ मे २०२४ पासून गुरु ग्रह वृषभ राशीत विराजमान असून तो संपूर्ण एक वर्ष याच राशीत राहील. गुरु ग्रह ९ ऑक्टोबर २०२४ रोजी वृषभ राशीत वक्री होणार असून तो ४ फेब्रुवारी २०२५ पर्यंत वक्री अवस्थेत राहील. हा ११९ दिवसाचा कालावधी काही राशीच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल.
मिथुन
गुरु ग्रहाची वक्री चाल मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी शुभ परिणामकारक ठरेल. या काळात मिथुन राशीच्या व्यक्तींची आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे. या काळात करिअरमध्ये यश मिळेल; तसेच पदोन्नतीही मिळेल. आनंदी वार्ता कानी पडतील, कुटुंबात शुभ कार्य होतील. मुलांकडून मदत मिळेल.
कन्या
कन्या राशीच्या व्यक्तींसाठी देखील हा काळा खूप लाभकारी सिद्ध होईल. या काळात नोकरी, व्यवसायात प्रगती होईल. अचानक धनलाभ होईल आणि अडकलेले पैसे परत मिळतील. भाग्य तुमच्या बाजूने असेल, आनंदी असाल. समाजात मान-सन्मान वाढेल. या काळात तुम्ही नेहमी सकारात्मक राहाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील तसेच जे अविवाहित आहेत, त्यांचे लग्न ठरेल.
हेही वाचा: पुढचे नऊ महिने बक्कळ पैसा! ‘या’ चार राशीधारकांवर असणार देवी लक्ष्मीचा वरदहस्त
वृश्चिक
गुरुची वक्री चाल वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी देखील खूप अनुकूल असेल. या काळात तुमच्यात साहस निर्माण होईल. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान-सन्मान वाढेल. सर्वत्र तुमचा विजय होईल. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल, आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. आयुष्यात काही अडचणी येतील; पण तुम्ही त्या दूर करण्यास सक्षम असाल. परदेशात जाण्याचा योग आहे.
(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
© IE Online Media Services (P) Ltd