Eid Al Fitr 2023 Date: मुस्लीम समाजासाठी ‘ईद-उल-फित्र’ हा सण खूप खास मानला जातो. या सणाला ‘मिठी ईद’, ‘ईद-उल- फितर’ असेही म्हणतात. केवळ भारतातच नाही तर परदेशातही मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जातो. मुस्लीम बांधव रमजानच्या पवित्र महिन्यात उपवास ठेवतात आणि शेवटच्या दिवशी ‘ईद-उल-फित्र’ अर्थात ईद साजरी करतात. रमजान महिना म्हणजे प्रार्थना आणि रोजा (उपवास) करण्याचा महिना मानला जातो. मुस्लीम कॅलेंडरनुसार, शव्वाल महिन्याच्या पहिल्या तारखेला ‘ईद-उल-फित्र’ साजरी केली जाते. पण, ईद-उल-फित्रची तारीख चंद्र पाहूनच ठरवली जाते. दक्षिण आशियाई संस्कृतींमध्ये ज्याला ‘चांद रात’ हा शब्द वापरला जातो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विशेषत: भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये ईद-उल-फित्र किंवा ईद-उल-अधाच्या (बकरी ईद) पूर्वसंध्येला सूचित करण्यासाठी या शब्दाचा वापर होतो. हा शब्द उर्दूमधून आला आहे.

“चांद” म्हणजे चंद्र आणि “रात” म्हणजे रात्र, अशा प्रकारे चंद्र दिसणारी रात्र, म्हणजे ‘चांद रात’. ही रात्र मुस्लिमांसाठी महत्त्वपूर्ण आहे, कारण ती रमजानच्या पवित्र महिन्याची समाप्ती, जुल-हिज्जाह महिना आणि शव्वाल महिन्याची सुरुवात करते. जगाच्या कानाकोपऱ्यातील मुस्लिमांना एकत्र आणणारा हा एक महत्त्वाचा आणि आनंदाचा सण मानला जातो.

मुस्लीम कॅलेंडर Lunar म्हणजे चांद्र कॅलेंडर आहे. या कॅलेंडरनुसार १० व्या शव्वाल महिन्याच्या पहिल्या तारखेला आणि रमजानच्या शेवटच्या दिवशी चंद्र दिसल्यानंतर ईद-उल-फित्रचा सण साजरा केला जातो, तर काही ठिकाणी सौर कॅलेंडरचाही आधार घेतला जातो. काही ठिकाणी चंद्र पाहण्यास जबाबदारी दिलेल्या अधिकाऱ्यांवर आणि खगोलशास्त्रचा आधार घेत तारीख निश्चित केली जाते. यामुळे विविध देश वेगवेगळ्या तारखांना ईद साजरी केली जाते. मुस्लीम समाज यादरम्यान सामुदायिक प्रार्थना, मेजवानी आणि दानधर्म यासह विविध परंपरांचे पालन करतात.

भारत आणि इतर देशांमध्ये ईद-उल-फित्र साजरा करण्याच्या तारखा

भारतात ईद-उल-फित्र २०२४ ची तारीख शव्वालचा चंद्र दिसण्यावर अवलंबून आहे. यामुळे ईद साजरी करण्याची नेमकी तारीख अद्याप ठरलेली नाही. या वर्षी, चंद्र ९ एप्रिल २०२४ रोजीच्या रात्री दिसण्याची अपेक्षा आहे. २९ वा रोजा पूर्ण झाल्यानंतर चंद्र दिसला, तर ईद १० एप्रिल २०२४ रोजी साजरी केली जाईल. अन्यथा ३० वा रोजा पूर्ण झाल्यावर चंद्र दिसला तर हा सण ११ एप्रिल २०२४ रोजी साजरा केला जाईल. चंद्रकोर दिसणे ही इस्लाममधील एक महत्त्वपूर्ण धार्मिक प्रथा आहे, ज्यावर ईद-उल-फित्रची तारीख निश्चित होते.

इस्लामिक कॅलेंडर चंद्र चक्रावर आधारित आहे. यामुळे ईद-उल-फित्रची तारीख दरवर्षी शव्वालचा चंद्र दिसल्यानंतर अंदाजे १० ते ११ दिवस आधी बदलते, कारण हे चंद्र कॅलेंडर लहान, म्हणजे फक्त ३५४ दिवसांचे असते. सूर्यावर आधारित ग्रेगोरियन कॅलेंडर, जे भारत आणि जगाच्या इतर भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. भारतातील ईद-उल-फित्रची तारीख शव्वालचा चंद्र पाहून ठरवली जाते, जी रमजानच्या पवित्र महिन्याच्या शेवटी आणि ईद-उल-फित्रच्या सणाची सुरुवात दर्शवते.

यूएई, सौदी अरेबिया आणि इतर राष्ट्रांमध्ये ईद-उल-फित्रचा चंद्र केव्हा दिसेल?

सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, ओमान, कतार, कुवेत, बहरीन, इजिप्त, तुर्की, इराण आणि युनायटेड किंग्डममध्ये सर्वोच्च न्यायालयाने सर्व मुस्लिमांना ८ एप्रिल २०२४ रोजी संध्याकाळी अर्धचंद्र (चंद्रकोर) पाहण्याचे आवाहन केले आहे. रमजानचा शेवट आणि शव्वाल महिन्याची सुरुवात दर्शवणारा हा चंद्र असेल.

या देशांमध्ये चंद्र दिसल्यास ८ एप्रिल २०२४ रोजी ईद-उल-फित्र साजरी केली जाईल, पण ८ एप्रिल रोजी चंद्र न दिसल्यास ९ एप्रिल रोजी चंद्र दिसण्याची वाट पाहिली जाईल. जर त्यानंतरही दिसला नाही तर १० एप्रिल २०२४ रोजी ईद-उल-फित्र साजरी केली जाईल, यामुळे या देशांतील मुस्लीम बांधव रमजानमध्ये २९ दिवसांऐवजी ३० दिवसांचा उपवास ठेवतील.

सौदी अरेबिया, पाकिस्तान, संयुक्त अरब अमिराती, ओमान, कतार, कुवेत, बहरीन, इजिप्त, तुर्कस्तान, इराण, युनायटेड किंगडम यांसह विविध देशांमध्ये ईद-उल-फित्रची तारीख निश्चित करण्यासाठी शव्वालचा चंद्र दिसणे महत्त्वपूर्ण मानले जाते.

थोडक्यात, ईदचा चंद्र दिसणे हा सणाचा महत्वाचा भाग असतो, ही मुस्लीम बांधवांची ऐक्य आणि चिंतन करण्याची वेळ असते. हा एक प्रसंग आहे जो लोकांना एकत्र आणतो, आध्यात्मिक एकतेची भावना वाढवतो आणि परंपरेचे महत्त्व आणि इस्लामिक रीतिरिवाजांचे स्मरण करून देतो.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eid al fitr 2024 chand raat ramadan eid 2024 know the date and timings of eid al fitr moon sighting sjr