Jupiter Moon Conjunction: ज्योतिषशास्त्रात देवगुरु बृहस्पती म्हणजेच गुरुचा गोचर अत्यंत प्रभावशाली मानला जातो, कारण जेव्हा-जेव्हा गुरु आपली दिशा किंवा गती बदलतात, तेव्हा त्या बदलाचा थेट परिणाम माणसाच्या आयुष्यावर दिसून येतो. पंचांगानुसार, अतिचारी गुरु १८ ऑक्टोबर रोजी कर्क राशीत प्रवेश करून ते ५ डिसेंबरपर्यंत याच राशीत स्थिर राहणार आहेत. या काळात गुरु दररोज एखाद्या ग्रहासोबत शुभ-अशुभ योग निर्माण करत आहेत.

याचदरम्यान १० नोव्हेंबर रोजी देवगुरु बृहस्पती आणि चंद्रमा एकत्र येऊन अत्यंत शुभ असा गजकेसरी योग निर्माण करणार आहेत. या दिवशी दुपारी १ वाजून २ मिनिटांनी चंद्र कर्क राशीत प्रवेश करतील आणि त्यामुळे हा शुभ योग साकारेल. त्याच वेळी गुरु आधीच या राशीत ‘हंस महापुरुष राजयोग’ निर्माण करून बसले आहेत, त्यामुळे या दोन शुभ योगांचा संयोग अनेक राशींना अनपेक्षित लाभ देऊ शकतो, असं ज्योतिष मानतं. चला पाहूया, कोणत्या राशींचं भाग्य उजळणार आहे…

पुढच्या ११ दिवसांत या राशींचं नशिब पालटणार!

मेष (Aries)

१० नोव्हेंबरला तयार होणाऱ्या गजकेसरी योगामुळे मेष राशीच्या लोकांचा सुवर्णकाळ सुरू होऊ शकतो, असं ज्योतिष सांगतं. या काळात व्यापारात वाढीच्या संधी मिळू शकतात. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी योग्य वेळ ठरू शकते.
कार्यक्षेत्रात वरिष्ठांचा पाठिंबा मिळू शकतो, तर पैशाच्या बाबतीत नवे मार्ग खुलू शकतात. आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता आहे. घरात एखादी आनंदवार्ता मिळू शकते, ज्यामुळे मन प्रसन्न राहील.

कर्क (Cancer)

गजकेसरी योगाचा थेट परिणाम कर्क राशीवर होणार आहे, कारण चंद्र आणि गुरु दोन्ही याच राशीत एकत्र येणार आहेत, त्यामुळे या राशीच्या जीवनात बदलाची नवी दारे उघडू शकतात. समाजात प्रतिष्ठा वाढेल, वरिष्ठांकडून नवीन जबाबदारी मिळू शकते. खूप काळापासून चाललेली मेहनत फळ देऊ शकते. काहींना बढती किंवा आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. घरगुती वातावरण आनंदी राहील आणि मनावरील ताण कमी होईल.

वृश्चिक (Scorpio)

वृश्चिक राशीसाठी हा काळ आर्थिक आणि मानसिक स्थैर्य देणारा ठरू शकतो. ज्योतिषशास्त्रानुसार, या काळात जुन्या समस्यांपासून मुक्ती मिळू शकते. पैशाचे अडथळे दूर होऊन गुंतवणुकीसाठी योग्य काळ सुरू होऊ शकतो.
करिअरमध्ये प्रगतीची चिन्हं दिसू शकतात, तसेच काहींना नवी नोकरी किंवा नवीन संधी मिळू शकतात. घरात शुभकार्य किंवा मंगल प्रसंगाचे योग तयार होत आहेत.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. त्याच्या तथ्यांबद्दल लोकसत्ता कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोराही देत नाही.)