Gajkesari Rajyoga: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार होळा हा सण १४ मार्च रोजी सर्वत्र साजरा केला जाणार आहे. या वर्षी होळीच्या दिवशी गजकेसरी राजयोग निर्माण होत आहे. कारण होळीच्या दिवशी चंद्र त्याच्या उच्च राशी वृषभमध्ये प्रवेश करणार आहे. तसेच गुरु आधीपासूनच वृषभ राशीमध्ये प्रवेश करत आहे. अशात या दोन्ही युतीपासून गजकेसरी राजयोग निर्माण होत आहे ज्यामुळे काही राशींचे नशीब बदलू शकते. तसेच या राशींच्या लोकांना इंक्रीमेंट आणि प्रमोशनचे योग निर्माण होऊ शकतात. जाणून घेऊ या त्या नशीबवान राशी कोणत्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मिथुन राशी (Mithun Zodiac)

मिथुन राशीच्या लोकांसाठी गजकेसरी राजयोग निर्माण होणे लाभदायक ठरू शकते. कारण हा राजयोग या राशीच्या बाराव्या स्थानी निर्माण होतआहे. त्यामुळे या वेळी आपण धन संपत्तीची सेव्हिंग करू शकतात. तसेच नवीन कार्याची सुरुवात होऊ शकते. धार्मिक कार्यांमध्ये आवड निर्माण होते. पगारामध्ये वाढ होऊ शकते. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी ही वेळ चांगली राहीन. तसेच या दरम्यान या लोकांच्या इच्छा पूर्ण होतील. धन संपत्तीची सेव्हिंग करण्यात यशस्वी व्हाल. या दरम्यान या लोकांना प्रॉपर्टीच्या देवाण घेवाण पासून लाभ मिळू शकतो.

सिंह राशी (Leo Zodiac)

गजकेसरी राजयोग निर्माण झाल्याने सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत प्रतिकूल ठरू शकतो. कारण हा राजयोग या राशीच्या दहाव्या स्थानावर निर्माण होत आहे. त्यामुळे या वेळी काम आणि व्यवसायात चांगली प्रगती मिळू शकते. तेच कामाच्या ठिकाणी या लोकांना सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेन. आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा दिसून येईल. नवीन गोष्टी करण्याचा विचार करणार आणि त्यात यशस्वी होतील. या लोकांचा आत्मविश्वास पूर्वीपेक्षा जास्त वाढएन. व्यवसायासाठी हा काळ उत्तम आहे. व्यवसायात प्रगती करण्यासाठी नवीन योजना बनवाल आणि त्यात लाभ मिळेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांना नोकरी मिळू शकते. काही लोकांना प्रमोशन मिळू शकते.

मकर राशी (Makar Zodiac)

या लोकांसाठी गजकेसरी राजयोग निर्माण होणे लाभदायक ठरू शकते. कारण हा राजयोग या राशीच्या पाचव्या भावावर निर्माण होत आहे. त्यामुळे या वेळी या लोकांना अपत्याशी संबंधित शुभ वार्ता मिळू शकते. या लोकांना अचानक धनलाभ मिळू शकतात.
कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करू शकता. आर्थिक परिस्थिती उत्तम राहीन. घरातील सदस्यांबरोबर वेळ घालवू शकतील किंवा प्रॉपर्टी मध्ये गुंतवणूक करूु शकता. या दरम्यान या लोकांना प्रेम संबंधांमध्ये यश मिळू शकते. हे लोक धार्मिक किंवा मांगलिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gajkesari rajyog guru and chandra yuti created gajkesari rajyog three zodiac get immense wealth and money ndj