Griha Pravesh Muhurat in 2025 : हक्काचे घर घेण्याचे स्वप्न प्रत्येकाचे असते. त्यासाठी अनेक जण भरपूर मेहनत घेत असतात. मग त्यानंतर घराची चावी हातात आली की, मग आपला आनंद गगनात मावत नाही. पण, या नवीन घरात कायमस्वरूपी प्रवेश करण्यापूर्वी एखादी पूजा आवर्जून घातली जाते. हिंदू परंपरेनुसार नवीन घरात प्रवेश करण्यासाठी एक विशिष्ट गृहप्रवेशाची पूजा केली जाते. त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा, सुख-शांती व धनसंपत्ती येते, असे मानले जाते. त्यामुळे गृहप्रवेश योग्य मुहूर्तावर करावा, तर पाहूयात गृहप्रवेशाचे शुभ मुहूर्त कोणत्या तारखेपासून सुरू होणार आहेत ते…
१ नोव्हेंबर रोजी देवउठनी एकादशीनंतर सर्व शुभ विधी पार पडतील. त्यातच नवीन घरांमध्ये गृहप्रवेश करणेही समाविष्ट आहे. आता वर्ष संपायला फक्त नोव्हेंबर आणि डिसेंबर महिने उरले आहेत. त्यामुळे या उरलेल्या दिवसांमध्ये गृहप्रवेशासाठी कोणत्या शुभ तारखा आहेत हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे; जेणेकरून तुमच्या नवीन घरात सुख, शांती आणि सौभाग्य कायम राहील.
zeenews.india.com ने दिलेल्या माहितीनुसार नोव्हेंबरमधल्या शुभ तारखा
नोव्हेंबरमधल्या शुभ तारखा
३, ६, ७, ८ १४, १५, २४ आणि २९ नोव्हेंबर २०२५.
डिसेंबरमधल्या शुभ तारखा
१, ५ आणि ६, डिसेंबर २०२५.
कोणतेही कार्य व्यवस्थित पार पडावे म्हणून हिंदू धर्मात कुठलंही शुभ कार्य करताना दिवस आणि तिथीचा विचार आवर्जून केला जातो. महत्त्वाचं कार्य शुभ तिथीला करण्यावर सर्वांचा ठाम विश्वास असतो. शुभ मुहूर्तावर एखाद्या कामाची सुरुवात केली की, त्यात कुठलाही अडथळा येत नाही आणि सर्व काही सुरळीत पार पडतं, अशी अनेकांची भावना असते.
