Gajkesari Yog 2025: ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र हा सर्वात वेगाने फिरणारा ग्रह मानला जातो. चंद्र एका राशीत सुमारे अडीच दिवस राहतो. अशा स्थितीत चंद्र कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी जोडला जातो. ज्यामुळे शुभ किंवा अशुभ योग निर्माण होतात. २४ मार्च २०२५ रोजी चंद्र मकर राशीत प्रवेश करणार असून या राशीवर वृषभ राशीतील गुरूची दृष्टी पडेल, त्यामुळे गजकेसरी राजयोग निर्माण होईल. या राजयोगाच्या प्रभावाने १२ राशींच्या व्यक्तींवर त्याचा शुभ परिणाम पाहायला मिळेल. या योगाच्या प्रभावाने या राशीच्या व्यक्तींना प्रत्येक कामात यश, आनंद आणि सुख, समृद्धीच् सुख मिळवता येईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंचांगानुसार, चंद्र २४ मार्च रोजी सकाळी १० वाजून २४ मिनिटांनी मकर राशीमध्ये प्रवेश करणार असून तो २६ मार्च रोजी दुपारी ३ वाजून १४ मिनिटांपर्यंत या राशीत राहील. या काळात गुरूची दृष्टी मकर राशीवर पडेल ज्याच्या प्रभावाने गजकेसरी राजयोग निर्माण होईल. ज्योतिषशास्त्रामध्ये हा योग अत्यंत शुभ मानला जातो.

‘या’ तीन राशींचे नशीब फळफळणार

मेष

मेष राशीच्या व्यक्तींसाठी हा योग अत्यंल सकारात्मक ठरेल. या काळात तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील. या राशीच्या चंद्र दहाव्या घरात आहे. ज्यामुळे अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. भाग्याची पुरेपुर साथ मिळेल. पार्टनरबरोबर चांगला वेळ घालवाल. उत्पन्नात वाढ होईल. या काळात कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. अचानक धनलाभ होतील, या काळात अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. आयुष्यात अनेक मोठे बदल पाहायला मिळतील. जोडीदाराबरोबरचे नाते अधिक घट्ट होईल. कर्ज फेडण्यास मदत होईल.

कन्या

गजकेसरी राजयोग कन्या राशीसाठी अनुकूल ठरणार आहे. या काळात तुम्हाला भाग्याची साथ मिळेल. या राशीच्या व्यक्तींना आयुष्यात अनेक बदल पाहायला मिळतील. या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. या काळात समाजात मान-सन्मान वाढेल. तुमच्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात प्रगती होईल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. या काळात तुम्ही नेहमी सकारात्मक राहाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील तसेच जे अविवाहित आहेत, त्यांचे लग्न ठरेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल आणि त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लानदेखील

मकर

हा राजयोग मकर राशीसाठी खूप लाभदायी ठरेल. या काळात तुम्हाला अनेक गोष्टी प्राप्त करण्यास मदत मिळेल. या काळात तुम्हाला आकस्मिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान-सन्मान वाढेल. वैवाहिक आयुष्यातील तणाव दूर होईल, भौतिक सुख-सुविधा प्राप्त कराल. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल, आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. धार्मिक कार्यात मन रमेल. आयुष्यात काही अडचणी येतील; पण तुम्ही त्या दूर करण्यास सक्षम असाल.

(टीप: सदर लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Guru and chadra yuti create gajaksari rajya yoga three zodiac signs get money and healthy relationship career growth sap