Jupiter Transit August 2025: गुरू ग्रह ज्याला बृहस्पती किंवा देवगुरू म्हणूनही ओळखलं जातं हा ज्योतिषशास्त्रात अत्यंत शुभ आणि प्रभावशाली ग्रह मानला जातो. गुरूची कृपा ज्या कुंडलीवर असते, त्याचं भाग्य तेजस्वी होतं, अडथळे दूर होतात आणि आयुष्यात स्थैर्य व समृद्धी येते. विवाह, संतानप्राप्ती आणि करिअरमध्येही यश मिळवण्यासाठी गुरूचा विशेष हात असतो. पण आता, २०२५ चा ऑगस्ट महिना घेऊन येतोय काहीतरी खास… आणि थोडंसं अनपेक्षितही.

वैदिक पंचांगानुसार, गुरू ग्रहाची ऑगस्टमध्ये दुहेरी चाल पाहायला मिळणार आहे. होय, या महिन्यात गुरू दोनदा नक्षत्र बदलणार आहेत आणि ही दोन वेगळी चाले काही राशींसाठी भाग्याचं गुप्त दार उघडू शकतात. १३ ऑगस्ट २०२५ रोजी पहाटे ५:४४ वाजता, गुरू पुनर्वसू नक्षत्राच्या पहिल्या चरणात गोचर करतील. तर ३० ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११:२८ वाजता, ते दुसऱ्या चरणात जातील. गुरू संपूर्ण महिनाभर मिथुन राशीतच राहतील, पण त्यांची नक्षत्रातील चाल ‘नशीब’ कसं फिरवते हे पाहणं रंजक ठरेल.

कोणत्या राशींना मिळणार गुरू कृपेचा लाभ?

मेष

मेष राशीच्या मंडळींवर गुरूंची खास कृपा राहणार आहे. या काळात विशेष लाभ होऊ शकतात. या राशीच्या लोकांची व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जातून सुटका होण्याची शक्यता आहे. या दरम्यान तुमची आर्थिक स्थितीदेखील चांगली असणार आहे. नोकरीत बढती किंवा नव्या जबाबदाऱ्यांच्या संधी मिळू शकतात. स्पर्धा परीक्षा सुरु असेल तर त्यात तुमची कामगिरी चांगली होऊ शकते. तुमच्या कामामुळे समाजात तुमचा चांगला मान-सन्मान वाढेल. 

कर्क

देवगुरुच्या कृपेने कर्क राशीच्या लोकांना शुभ परिणाम मिळू शकतात. या काळामध्ये तुम्हाला आर्थिक लाभ, नोकरीत बढती, उत्पन्नात वाढ आणि कर्जातून मुक्तता मिळू शकेल. तसेच, सुख-संपत्तीत चांगली वाढ पाहायला मिळू शकते. मालमत्तेशी संबंधित बाबींमध्ये यश मिळू शकतं. धन आणि मालमत्तेत वाढ होण्याची शक्यता आहे. प्रेमजीवनात सकारात्मक बदल होतील. रखडलेली कामं पूर्ण होऊ शकतात. घरात शांतता, समाधान आणि आनंदाचे वातावरण असेल. 

मीन

मीन राशीच्या लोकांचे देवगुरुच्या कृपेने सुखाचे दिवस येऊ शकतात. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना अपेक्षित यश मिळू शकतो. आर्थिक बाबतीत चांगले परिणाम दिसून येऊ शकतात. भौतिक सुख-समृद्धीचा तुम्ही लाभ घ्याल. अडकलेलं धन परत मिळू शकतं. आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते. तुम्हाला नोकरीत वरिष्ठ पद मिळू शकते. या कालावधीत अनपेक्षितपणे धनलाभ होऊ शकतो. व्यवसायात नफा होण्याची शक्यता आहे. रखडलेल्या कामांना गती मिळू शकते.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)