Guru Gochar 2025: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होते; ज्याचा शुभ किंवा अशुभ प्रभाव १२ राशींपैकी काही राशीच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रात गुरू ग्रहाला ज्ञान, सौभाग्य आणि सुख-समृद्धीचा कारक ग्रह मानले जाते. गुरु सध्या वृषभ राशीत विराजमान असून तो मेपर्यंत याच राशी राहणार आहे. तसेच तो १० एप्रिल २०२५ रोजी गुरू मंगळ ग्रहाच्या मृगशिरा नक्षत्रामध्ये प्रवेश करेल. ज्याचा शुभ प्रभाव १२ राशींपैकी काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘या’ तीन राशींची होणार चांदी

मेष (Aries)

मेष राशीच्या व्यक्तींना गुरूचे नक्षत्र परिवर्तन खूप फायदेशीर ठरेल. या काळात तुम्हाला आकस्मिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान-सन्मान वाढेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप अनुकूल असेल. वैवाहिक आयुष्यातील तणाव दूर होईल. कर्ज कमी होण्यास मदत होईल. दूरचे प्रवास घडतील. आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. या काळात तुम्हाला भाग्याची साथ मिळेल.

कर्क (Cancer)

गुरूचे नक्षत्र परिवर्तन कर्क राशीच्या व्यक्तींसाठी लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. या काळात समाजात मान-सन्मान, पद-प्रतिष्ठा वाढेल. पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात प्रगती होईल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. धार्मिक स्थानांना भेट द्याल. अध्यात्माविषयी मनात ओढ राहील. वैवाहिक जीवन सुखमय राहील. भौतिक सुख प्राप्त होईल.

धनु (Sagittarius)

धनु राशीच्या व्यक्तींना गुरूचे नक्षत्र परिवर्तन खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. अचानक धनलाभ होतील, आयुष्यात अनेक मोठे बदल पाहायला मिळतील. जोडीदाराबरोबरचे नाते अधिक घट्ट होईल. कर्ज फेडण्यास मदत होईल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे. या काळात करिअरमध्ये यश मिळेल; तसेच पदोन्नतीही मिळेल. तुमच्या भावडांबरोबर चांगले क्षण व्यतीत कराल.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Guru nakshatra gochar 25 three zodic get new job and love healthy life sap