Premium

पुढील ११ महिने ‘या’ राशींचे ‘अच्छे दिन’? गुरूदेवाच्या आशीर्वादाने वर्षभर प्रचंड पैसा मिळण्याची शक्यता

ज्योतिषशास्त्रात देवगुरु बृहस्पती हे सुख-संपत्ती, वैभव आणि ऐश्वर्य इत्यादींचे कारक मानले जातात.

Guru Rashi Parivartan
गुरू १ मे २०२४ पर्यंत मेष राशीतच राहणार आहे. (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

ज्योतिषशास्त्रात देवगुरु बृहस्पती हे सुख-संपत्ती, वैभव आणि ऐश्वर्य इत्यादींचे कारक मानले जातात. जन्मकुंडलीमध्ये गुरू ग्रहाची शुभ स्थिती व्यक्तीला उंच पदापर्यंत घेऊन जाते असं मानलं जातं. गुरुचा वैवाहिक जीवनावर देखील प्रभाव पडतो. २०२३ मध्ये गुरुने २२ एप्रिल रोजी मेष राशीत प्रवेश केला होता. येत्या एक वर्षासाठी गुरू याच राशीत राहणार आहे. गुरू १ मे २०२४ पर्यंत मेष राशीत राहणार आहे. त्यामुळे गुरुच्या या परिवर्तनाचा कोणत्या राशींना लाभ होणार आहे ते जाणून घेऊया…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मेष –

गुरु मेष राशीत विराजमान आहे, त्यामुळे मेष राशीच्या लोकांसाठी हे गोचर खूप शुभ ठरु शकते. या काळात तुमची रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. तसेच या काळात तुम्हाला पालकांचे सहकार्य मिळु शकते. वैवाहिक जीवन आनंदी राहण्यासह धनलाभ होऊ शकतो. तर नोकरदारांना उत्पन्न वाढीसह प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे.

सिंह –

हेही वाचा- ७ जुलैपर्यंत ‘या’ राशींना धनाची कमीच पडणार नाही? लक्ष्मी राजयोग बनवू शकतो कोट्यधीशांचे मालक

सिंह राशीच्या लोकांसाठी गुरूचे राशी परिवर्तन वरदानापेक्षा कमी नाही. कारण येत्या ११ महिन्यांत तुम्हाला आनंद आणि समृद्धी मिळू शकते. तसेच तुम्हाला कामात यश मिळू शकते तर तुम्ही करिअरमध्ये नवीन उंची गाठू शकता. व्यापाऱ्यांना देखील या काळात खूप फायदा होण्याची शक्यता आहे.

कन्या –

कन्या राशीच्या लोकांसाठी येणारे ११ महिने आर्थिक प्रगती आणणारे ठरु शकतात. या काळात तुम्हाला तुमचे अडकलेले पैसे मिळू शकतात. कोर्टाशी संबंधित प्रकरणांमध्ये यश मिळू शकते.

तूळ –

तूळ राशीच्या लोकांना या काळात भरपूर पैसा मिळण्याची शक्यता आहे. तसेच तुमचे पैसे कुठे अडकले असतील तर ते तुम्हाला परत मिळू शकतात. तुम्ही जमीन-इमारत आणि वाहन खरेदी करु शकता. धार्मिक कार्यात व्यस्त राहाल तर मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते.

मीन –

हेही वाचा- जूनचा दुसरा आठवडा ‘या’ राशींसाठी लकी ठरणार? बुधदेवाच्या कृपेने प्रचंड धनलाभाची शक्यता

मीन राशीच्या लोकांना या काळात यश मिळू शकते. तसेच या काळात तुम्हाला उच्च अधिकार्‍यांचे सहकार्य मिळू शकते शिवाय त्यांच्याशी चांगले संबंध होऊ शकतात. वडिलोपार्जित मालमत्ता मिळू शकते. नोकरदारांना उत्पन्न वाढीसह प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे.

(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Guru rashi parivartan with the blessings of gurudev one can get huge money throughout the year effect of jupiter transit jap