Budhaditya Rajyog In Tauru: ज्योतिषशास्त्रानुसार काही ठरावीक काळानंतर प्रत्येक ग्रहाचे राशी परिवर्तन होते. या राशी परिवर्तनामुळे अनेकदा त्यांची इतर ग्रहांसोबत युती निर्माण होते; ज्यामुळे शुभ योग आणि राजयोग निर्माण होतात. या शुभ योग आणि राजयोगाचा प्रभाव काही राशींच्या व्यक्तींवर जास्त प्रमाणात पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रात बुधादित्य राजयोगाला खूप खास मानले जाते. १४ मे रोजी सूर्य ग्रहाने वृषभ राशीमध्ये प्रवेश केला होता. आता ३१ मे रोजी याच राशीमध्ये बुध ग्रहदेखील राशी परिवर्तन करणार आहे. त्यामुळे वृषभ राशीत बुध आणि सूर्याच्या युतीमुळे ‘बुधादित्य योग’ निर्माण होईल. हा राजयोग काही राशींच्या व्यक्तींसाठी खूप शुभ फळ देणारा असेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कन्या

बुध आणि सूर्याची युती निर्माण होत असल्यामुळे या राशीच्या व्यक्तींसाठी हा योग खूप शुभ फळ देईल. या काळात अनेकदा आकस्मिक धनलाभ होतील. करिअरमध्ये चांगले बदल पाहायला मिळतील. अडकलेले पैसे परत मिळतील. नव्या नोकरीची ऑफर मिळेल. कुटुंबात शुभ कार्ये होतील. मार्केटिंग, मीडिया, बँक व शिक्षण या क्षेत्रांतील व्यक्तींना यश मिळेल. या काळात आरोग्य उत्तम राहील. तुम्ही सकारात्मक विचार कराल.

सिंह

या राशीच्या व्यक्तींसाठीही बुधादित्य योग उत्तम सिद्ध होईल. या काळात भाग्याची पुरेपूर साथ मिळेल. तुम्ही आनंदी राहिल्यामुळे प्रत्येक कामात सहज यश प्राप्त कराल. कुटुंबातील वाद मिटतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. व्यवसाय करणाऱ्यांना धनलाभ होईल. तीर्थक्षेत्राला भेट द्याल. आर्थिक चणचण दूर होईल; तसेच वायफळ खर्च थांबतील. मुलांसोबत सहलीला जाल.

हेही वाचा: सूर्य देणार बक्कळ पैसा! नक्षत्र परिवर्तनाने ‘या’ तीन राशीच्या लोकांचे चमकणार भाग्य

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठीही बुधादित्य योग भाग्यकारक ठरेल. या काळात भाग्य तुमच्या बाजूने असेल. शत्रू तुमच्या वाटेला जाणार नाहीत. व्यवसायात आकस्मिक धनलाभ होतील. दूरचे प्रवास घडतील. तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना हवे तसे यश मिळेल. नवे वाहन, घर, जमीन खरेदी करू शकता. सगळीकडे तुमचे वर्चस्व असेल.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Horoscope money come in your life immense grace of lakshmi on these three rasis due to the influence of budhaditya rajayoga sap