मेष:-

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्यावसायिक स्तर सुधारेल. अपेक्षित लाभाची अपेक्षा पूर्ण होईल. कामात सहकार्‍यांची मदत घेता येईल. कामे वेळेत पूर्ण करण्यावर भर द्याल.  कामाची योग्य पावती मिळेल.

वृषभ:-

अपेक्षित लाभाने खुश व्हाल. मनातील इच्छा पूर्ण करता येईल. कमिशनच्या कामातून लाभ होईल. अधिकारी व्यक्तींचा घरात वावर राहील. घरगुती वापराच्या वस्तु खरेदी कराल.

मिथुन:-

मनातील चुकीच्या विचारांना खतपाणी घालू नका. वैवाहिक सौख्याकडे लक्ष द्यावे. आपली कला इतरांसमोर सादर करता येईल. तुमच्यातील चांगल्या गुणांचे कौतुक केले जाईल. मदतीचा हात सढळ ठेवाल.

कर्क:-

अचानक धनलाभाची शक्यता. वैचारिक स्थिरता ठेवावी. मानसिक व्यग्रता जाणवेल. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. पत्नीशी मतभेद संभवतात.

सिंह:-

भागीदाराशी मतभेद संभवतात. आर्थिक प्रश्न मार्गी लागतील. जमिनीच्या कामातून लाभ संभवतो. कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल. मुलांचे धाडस वाढेल.

कन्या:-

पत्नीची उत्तम साथ मिळेल. एकमेकांमधील प्रेमळ सहवास वाढीस लागेल. भागीदाराशी सुसंवाद साधला जाईल. तुमचे संपर्क क्षेत्र वाढेल. प्रलोभनापासून दूर राहावे.

तूळ:-

कामातील ऊर्जा वाढेल. हातात नवीन अधिकार येतील.  आकर्षणाला बळी पडू नका. हाताखालील लोकांकडून सहकार्य मिळेल. नातेवाईकांची मदत घेता येईल.

वृश्चिक:-

सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घ्याल. स्त्रियांशी ओळख वाढेल. छंद जोपासण्यास वेळ देता येईल. कलात्मक दृष्टीकोन ठेवाल. सहवासातून मैत्री घट्ट होईल.

धनू:-

घराचे सुशोभीकरण काढाल. कामाचे योग्य नियोजन कराल. सारासार विचार करण्यावर भर द्यावा. घरातील वातावरण खेळीचे राहील. जवळचा प्रवास घडेल.

मकर:-

शांततेचे धोरण स्वीकारावे. सामुदायिक गोष्टींमध्ये सावधतेने वागावे. प्रवासात काळजी घ्यावी. आध्यात्मिक बळ वाढवावे. जबाबदारीची जाणीव ठेवून वागाल.

कुंभ:-

मानसिक स्थैर्य जपावे. घाई घाईने कोणतेही निर्णय घेऊ नका. क्षुल्लक गोष्टींवर प्रतिक्रिया देणे टाळा. आवडीच्या गोष्टींमध्ये मन रमवावे. मित्रांशी मतभेद संभवतात.

मीन:-

आपल्या मर्जीप्रमाणे वागाल. कामातील बदल जाणून घ्यावेत. बदलाकडे सकारात्मकतेने पहावे. फसवणुकी पासून सावध रहा. आनंदी दृष्टिकोन ठेवून वागावे.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Horoscope today 11 march 2022 daily astrology rashi bhavishya in marathi msr