Venus And Ketu Impact On Zodiac Signs : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह वेळोवेळी राशी आणि नक्षत्र बदलतात, ज्याचा परिणाम मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर दिसून येतो. तर आता संपत्तीचा दाता शुक्र ग्रह सप्टेंबरमध्ये कन्या राशीत प्रवेश करणार आहे; जिथे केतू ग्रह आधीच स्थित आहे, त्यामुळे शुक्र आणि केतू ग्रहाची युती कन्या राशीत होणार आहे. या युतीचा परिणाम सगळ्याच राशींवर होईल. पण अशा तीन राशी आहेत, ज्यांचे चांगले दिवस यादरम्यान सुरू होऊ शकतात. चला जाणून घेऊया की या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या आहेत..
धनू (Sagittarius)
तुमच्या राशीसाठी शुक्र आणि केतू ग्रहाची युती सकारात्मक ठरू शकते. कारण ही युती तुमच्या राशीपासून नवव्या स्थानात होणार आहे. हा काळ पैसा, करिअर आणि बँक बॅलेन्सच्या बाबतीत खूप चांगला ठरेल. व्यावसायिकांना मोठ्या गुंतवणुकीतून फायदा होईल. वृद्धांना धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल आणि प्रतिष्ठा वाढेल. तसेच स्पर्धात्मक विद्यार्थ्यांना यावेळी परीक्षेत यश मिळू शकते.
कर्क (Cancer)
शुक्र आणि केतूची युती कर्क राशीच्या लोकांसाठी शुभ ठरू शकते, कारण ही युती तुमच्या राशीच्या धन आणि वाणी स्थानात होणार आहे. यावेळी तुम्हाला वेळोवेळी आर्थिक लाभ होऊ शकतो, बोलणे प्रभावी ठरेल; ज्यामुळे लोक प्रभावित होतील. या काळात आत्मविश्वास वाढेल आणि तुमच्या करिअरमध्ये प्रगती दिसून येईल. नातेसंबंधांमध्येही सुसंवाद राहील. दुसरीकडे मार्केटिंग, मीडिया, शिक्षण आणि बँकिंग क्षेत्राशी संबंधित लोकांना फायदा होऊ शकतो.
वृश्चिक (Scorpio)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी शुक्र आणि केतूची युती शुभ ठरू शकते, कारण तुमच्या गोचर कुंडलीनुसार कर्मस्थानावर ही युती होणार आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला नोकरी, व्यवसायात चांगले यश मिळू शकते. परदेश दौरे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. नोकरी करणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी आदर, प्रगतीच्या संधी दिसून येतील. यावेळी नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या इच्छित ठिकाणी बदली मिळू शकते.