हिंदू धर्मात असे सांगितले जाते की जोड्या स्वर्गात बनल्या जातात. लग्न या गोष्टीला आपल्या आयुष्यात खूप महत्त्व असते. इतकेच नाही तर, ज्याच्याशी आपले नाते जोडले आहे त्याच्याशीच पुढील सात जन्म आपले नाते जोडलेले राहावे असेही म्हटले जाते. म्हणूनच आपल्याकडे लग्नाआधी मुला-मुलीची कुंडली अवश्य पाहिली जाते. यामध्ये वधू-वरांचे गुण जुळतात का हे पहिले जाते ज्यामुळे वैवाहिक जीवनात कोणताही अडथळा येत नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ज्योतिष शास्त्रानुसार कुंडलीमध्ये दुसरे, सातवे, अकरावे घर आणि त्याचे स्वामी लग्नाशी संबंधित मानले जातात. जर कुंडलीत दुसऱ्या, सातव्या आणि अकराव्या घराचा स्वामी मजबूत स्थितीत किंवा शुभ स्थितीत असेल तर व्यक्तीच्या वैवाहिक जीवनात अनुकूल परिणाम मिळतात. दुसरीकडे, शुक्र, गुरु आणि मंगळ हे ग्रह सुखी वैवाहिक जीवनासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. याशिवाय गण, ग्रहमात्री, नाडी, वैश्य, वर्ण, योनी, तारा आणि भकूट या आठ गोष्टींचे मिळून एकूण ३६ गुण होतात. आज आपण जाणून घेऊया कोणते योग आहेत ज्यामुळे वैवाहिक जीवन यशस्वी होते.

तुम्हालाही रात्री ‘ही’ भयानक स्वप्न पडतात का? जाणून घ्या याबाबत स्वप्नशास्त्र काय सांगते

पहिला योग :

जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शुक्र आणि गुरु हे ग्रह लाभदायक स्थितीत असतील आणि पहिल्या, पाचव्या, सातव्या, नवव्या आणि अकराव्या घरात असतील तर त्या व्यक्तीच्या सुखी वैवाहिक जीवनासाठी ते अनुकूल मानले जाते.

दुसरा योग :

जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीचे सातवे घर बलवान असेल आणि त्यात लाभदायक महादशा असेल तर ते देखील चांगले वैवाहिक जीवन सूचित करते.

तिसरा योग :

एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत सातव्या घरात गुरु किंवा सातव्या घराचा स्वामी असेल तर त्या व्यक्तीचे वैवाहिक जीवन अनुकूल राहते. याशिवाय एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत अनुकूल महादशा तयार होत असेल तरी त्या व्यक्तीला सुखी वैवाहिक जीवनाचे सौभाग्य प्राप्त होते.

Palmistry : ज्यांच्या हातावर असते अशी सूर्य रेषा, त्यांना प्राप्त होते धनसंपत्ती आणि मान-सन्मान

चौथा योग :

जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शुक्र पाचव्या घरात किंवा व्यक्तीच्या कुंडलीत उच्च स्थानावर स्थित असेल तर त्या व्यक्तीलाही वैवाहिक जीवनात आनंद मिळतो. मात्र, जर सातव्या घराचा स्वामी मजबूत स्थितीत असेल तरच या संयोगाचा परिणाम होतो.

पाचवा योग :

ज्यांच्या कुंडलीत दुसरे आणि चौथे घर मजबूत असते, त्यांचे वैवाहिक जीवनही छान असते. येथे दुसरे घर वैयक्तिक जीवनासाठी आहे, चौथे घर वैवाहिक जीवनातील नवीन नाते दर्शवते.

(येथे दिलेली माहिती सामान्य माहिती आणि गृहीतकांवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: If there are five yogs in the horoscope then marital life will be happy pvp