स्वप्न आपल्याला केवळ मनात चाललेले विचारच दाखवत नाहीत तर भविष्यात घडणाऱ्या घटनांसंबंधी इशारा देखील देत असतात. स्वप्न शास्त्रात स्वप्नांचे शुभ आणि अशुभ अर्थ सांगण्यात आले आहेत. काही स्वप्न अशी असतात, जी आयुष्यात सुख-संपत्ती, वैभव-ऐश्वर्य येण्याचा संकेत असतो. स्वप्न शास्त्रानुसार, सर्वच नाही परंतु काही स्वप्न अशी असतात जी आपल्या भविष्याशी जोडलेली असतात. अनेकदा आपल्याला भयानक स्वप्न पडतात. पण गरजेचे नाही की सर्वच भयानक स्वप्न आपल्याला अशुभ संकेत देतात. खरं तर, अशी अनेक भयानक स्वप्ने आहेत जी आपल्याला चांगली चिन्हे देतात. जाणून घेऊया स्वप्न शास्त्रानुसार कोणती भयानक स्वप्ने आहेत जी शुभ संकेत देतात.

  • स्वप्न शास्त्रानुसार, जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात जळणारी व्यक्ती दिसली तर हे स्वप्न तुमच्या आर्थिक लाभाशी संबंधित आहे. याचा अर्थ असा की तुम्हाला लवकरच धनलाभ होणार आहे.

Bappi Lahiri : सोनं लकी असल्याचं सांगायचे बप्पीदा; पण नक्की कोणत्या राशीच्या लोकांना होतो सोनं परिधान करण्याचा फायदा?

British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
Ashish patil shared experience of those who perform lavni and dance in women's clothes sometimes being raped
स्त्री पात्र निभावणाऱ्या पुरुषांना वेगळ्या नजरेने पाहिलं जातं; ‘लावणीकिंग’ आशिष पाटीलने सांगितला अनुभव, म्हणाला, “काहीजणांवर बलात्कार…”
Why is neem and jaggery consumed during Gudi Padwa 2024
गुढीपाडव्याला कडुलिंब आणि गुळाचे सेवन का करतात? काय आहे कारण, तज्ज्ञांकडून जाणून घ्या….
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र
  • जर तुम्हाला स्वप्नात व्यक्तीचा मृत्यू दिसत असेल तर घाबरण्याचे कारण नाही. याचाच अर्थ असा की त्या व्यक्तीवर आलेले संकट आता टळले आहे आणि या व्यक्तीचे वय वाढले आहे.

  • जर तुम्ही स्वप्नात स्वत:ला किंवा इतर कोणाला आत्महत्या करताना पाहिले तर ते शुभ लक्षण आहे. जर असे स्वप्न पाहणारी व्यक्ती बऱ्याच काळापासून आजारी असेल तर या स्वप्न संकेतांच्या आधारे तो लवकर बरा होऊ शकतो.

  • जर तुम्हाला स्वप्नात मृत शरीर किंवा अंत्ययात्रा दिसली तर स्वप्न शास्त्रानुसार तुमचे नशीब जागृत होणार आहे. जर एखाद्या आजारी व्यक्तीने असे स्वप्न पाहिले तर याचा अर्थ असा होतो की तो लवकरच बरा होणार आहे.

‘या’ व्यक्ती आयुष्यात कधीच यशस्वी होऊ शकत नाही; मार्गात येतात अनेक अडथळे

  • स्वप्न शास्त्रानुसार, जर तुम्हाला स्वप्नात तुमचे स्वतःचे कापलेले डोके दिसले तर याचा अर्थ तुम्हाला आर्थिक लाभ होणार आहे. जर तुम्हाला स्वप्नात तुमच्या डोक्याला दुखापत दिसली तर याचा अर्थ असा आहे की खूप दिवसांपासून अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात किंवा तुम्ही ज्या कामासाठी प्रयत्न करत आहात त्यात तुम्हाला यश मिळणार आहे.

(येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.)