Daily Horoscope Of All Zodiac Sign In Marathi, 18 June 2025 : १८ जून २०२५ रोजी जेष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी आहे. सप्तमी तिथी दुपारी १ वाजून ३५ मिनिटांपर्यंत राहील. बुधवारी सकाळी ७ वाजून ४० मिनिटांपर्यंत आणि त्यानंतर आयुष्मान योग जुळून येईल. रात्री १२ पर्यंत २३ मिनिटांपर्यंत पूर्वभाद्रपद नक्षत्र जागृत असेल. राहू काळ १२:३० वाजता सुरु होईल ते १:३० वाजेपर्यंत असणार आहे. कालपासून पाच दिवस पंचक योग सुरु असणार आहे. तर तुमचा बुधवार कसा जाणार जाणून घेऊया…
१८ जून २०२५ राशिभविष्य ( Horoscope Today in Marathi, 18 June 2025)
आजचे मेष राशिभविष्य (Aries Today Horoscope In Marathi)
उगाच कसली तरी कमतरता जाणवेल. मनातील चुकीच्या विचारांना आवर घालावी लागेल. कौटुंबिक सौख्य वृद्धिंगत होईल. नोकरदारांना कामाचा ताण जाणवेल. वरिष्ठांना खुश ठेवावे लागेल.
आजचे वृषभ राशिभविष्य (Taurus Today Horoscope In Marathi)
कौटुंबिक रूसवे-फुगवे दूर करावे लागतील. जबाबदारीची जाणीव ठेवून वागावे. कामात सहकार्यांची मदत मिळेल. परिस्थितीनुसार कामात काही बदल करावे लागतील. मैत्रीतील जिव्हाळा वाढीस लागेल.
आजचे मिथुन राशिभविष्य (Gemini Today Horoscope In Marathi)
इतरांवर विसंबून राहू नका. गप्पा मारण्यात वेळ वाया घालवून चालणार नाही. लोकांचा तुमच्याबाबत गैरसमज होऊ शकतो. जोडीदाराच्या सौख्याला बहर येईल. मनातील इच्छा पूर्ण होईल.
आजचे कर्क राशिभविष्य (Cancer Today Horoscope In Marathi)
प्रतिकूलतेतून कष्टाने कामे करत राहाल. पोटाच्या तक्रारी जाणवू शकतात. कामाच्या ठिकाणी सहकार्य मिळेल. अपुरी कामे पूर्णत्वास जातील. जवळचे मित्र भेटतील.
आजचे सिंह राशिभविष्य (Leo Today Horoscope In Marathi)
मनोरंजनातून आनंद घ्याल. मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. सढळ हाताने मदत कराल. जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी घ्यावी. विरोधकांवर लक्ष ठेवावे
आजचे कन्या राशिभविष्य (Virgo Today Horoscope In Marathi)
अपचनाचा त्रास जाणवेल. क्षुल्लक कारणाने नाराज होऊ नका. स्वभावात काहीसा चिडचिडेपणा येईल. वादाच्या मुद्यांपासून दूर राहावे.
आजचे तूळ राशिभविष्य (Libra Today Horoscope In Marathi)
मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष द्या. कौटुंबिक गोष्टीत संयम बाळगावा. जवळच्या प्रवासाचे योग आहेत. शेअर्सच्या व्यवहारातून लाभ संभवतो. कामात नवीन पर्यायांचा अवलंब करावा.
आजचे वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Today Horoscope In Marathi)
किरकोळ कौटुंबिक कटकटी राहतील. अनावश्यक खर्चावर ताबा ठेवावा. मनात नसत्या शंका आणू नका. विद्यार्थ्यांना अभ्यासात क्षुल्लक अडचणी येऊ शकतात. हाताखालील लोकांवर विसंबून राहू नका.
आजचे धनू राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope In Marathi)
मुलांचे वागणे त्रासदायक वाटू शकते. भौतिक गोष्टींवर अधिक खर्च कराल. शिस्तीचा फार बडगा करून चालणार नाही. मित्रांकडून कौतुक केले जाईल. प्रवास सावधानतेने करावा.
आजचे मकर राशिभविष्य (Capricorn Today Horoscope In Marathi)
कामात उगाचच खो बसल्यासारखा वाटू शकतो. प्रकृती स्वास्थ्याकडे दुर्लक्ष नको. थोडी चिडचिड कमी करावी. जुन्या गोष्टी मनाला दुखवू शकतात. अति विचार करू नका.
आजचे कुंभ राशिभविष्य (Aquarius Today Horoscope In Marathi)
दुराग्रहीपणे निर्णय घेऊ नका. नवीन मित्र जोडण्याचा प्रयत्न करावा. घरगुती कामात रमून जाल. इच्छा नसताना प्रवास करावा लागेल. घरासाठी काही नवीन वस्तु खरेदी केल्या जातील.
आजचे मीन राशिभविष्य (Pisces Today Horoscope In Marathi)
मनावरील ताण दूर सारावा. कौटुंबिक प्रश्नातून मार्ग काढावा. घरी मोठ्या लोकांची ऊठबस राहील. सामाजिक जाणिवेतून काम कराल. आवडी-निवडी बाबत आग्रही राहाल.
ज्योतिषी विद्याधर करंदीकर