ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह विशिष्ट कालावधीत राशी परिवर्तन करुन शुभ आणि अशुभ योग तयार करतात, ज्याचा प्रभाव पृथ्वीवर दिसून येतो. तसेच हे ग्रह काही योग असे बनवतात जे अनेक वर्षांनी तयार होतात. आता हे ग्रह केदार योग बनवत आहेत. हा योग तेव्हा तयार होतो जेव्हा जन्मकुंडलीच्या चौथ्या स्थानी ७ ग्रह विराजमान असतात. या योगाचा सर्व राशीच्या लोकांवर प्रभाव दिसून येणार आहे. पण ३ राशी अशा आहेत, ज्यांना या काळात धन आणि सौभाग्य मिळण्याची शक्यता आहे. तर त्या ३ राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.

सिंह –

महाकेदार राजयोग सिंह राशीसाठी फायदेशीर ठरू शकतो. कारण बुधादित्य राजयोग तयार होत असून बुध-सूर्य लाभेश व कर्मेश आहेत. त्यामुळे तुम्हाला या काळात पैसे मिळू शकतात. तसेच नोकरी-व्यवसायातही तुमची चांगली प्रगती होऊ शकते. चंद्राच्या आगमनाने त्रिग्रही योगही तयार होणार आहे, ज्यामुळे तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते. परदेशात व्यवसाय करणाऱ्यांची प्रगती होऊ शकते.

तूळ –

तूळ राशीच्या लोकांसाठी महाकेदार राजयोग फायदेशीर ठरू शकतो. कारण तुमच्या राशीचा स्वामी शुक्र कर्माच्या स्थानी विराजमान आहे. यासोबतच केंद्र त्रिकोण आणि गजकेसरी राजयोग तयार झाला आहे. शिवाय बुधादित्य राजयोगदेखील तयार होणार आहे. त्यामुळे या काळात तुम्ही भाग्यवान होऊ शकता. तसेच काही जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होऊ शकतो. सर्व कामात यश मिळण्याची दाट शक्यता आहे. तुम्ही करत असलेल्या कामात तुमच्या कामगिरीचे कौतुक होण्यासह तुमची लोकप्रियता वाढू शकते.

मीन –

हेही वाचा- काही तासांनी ‘या’ राशींना मिळणार गडगंज पैसा? शनीदेवाच्या कृपेने अचानक धनलाभ होण्याची शक्यता

मीन राशीच्या लोकांसाठी महाकेदार राजयोग अनुकूल सिद्ध होऊ शकतो. कारण गुरू आणि चंद्र धनाच्या स्थानी असून तिसऱ्या स्थानी बुधादित्य राजयोग तयर होत आहे. याशिवाय मंगळ आणि शुक्राची युती तुमच्या गोचर कुंडलीच्या पाचव्या स्थानी होत आहे. त्यामुळे याकाळात तुम्हाला मुलांशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते. तसेच तुमच्या धैर्यात आणि शौर्यामध्ये वाढ होऊ शकते तसेच तुमचे काही ठिकाणी अडकलेले पैसेही परत मिळू शकतात.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)