ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा जेव्हा एखादा ग्रह संक्रमण करतो तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होतो. शनि, राहु आणि केतु हे ग्रह सर्वाधिक काळ एका राशीत ठाण मांडून बसतात. शनि अडीच वर्षे, तर राहु आणि केतु एका राशीत दीड वर्षे असतात. राहु आणि केतु उलट्या क्रमाने राशीत भ्रमण करत असतात. केतु वृश्चिक राशीतून तुळ राशीत प्रवेश करणार आहे. १२ एप्रिल २०२२ रोजी छाया ग्रह केतू शुक्राच्या राशीत प्रवेश करेल. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार ज्या घरामध्ये केतू कुंडलीत स्थित असेल. त्या घरानुसार फल प्राप्त होते. ज्योतिषशास्त्रात केतू हा कर्मप्रधान ग्रह मानला जातो आणि तो चांगल्या आणि वाईट दोन्ही कर्मांचे प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे केतूच्या गोचराचा प्रभाव सर्व राशींवर राहील. पण तीन राशींना विशेष फायदा होऊ शकतो. चला जाणून घेऊयात

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कन्या: केतू ग्रह राशीतील दुसऱ्या भावात प्रवेश करेल. या स्थानाला धन आणि वाणीचे घर म्हणतात. या काळात तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. तसेच व्यवसायात नफाही चांगला होऊ शकतो. जी लोकं भाषणाशी संबंधित क्षेत्रात काम करतात, जसं की वकील, शिक्षक, विपणन, मीडिया. त्यांच्यासाठी हा काळ अनुकूल असणार आहे. कन्या राशीचा स्वामी बुध हा व्यवसायाचा कारक आहे आहे. त्यामुळे या काळात व्यवसायात प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला मोठी जबाबदारी मिळू शकते.

धनु: तुमच्या संक्रमण कुंडलीत केतूचे राशी परिवर्तन अकराव्या भावात होईल. या स्थानाला उत्पन्न आणि लाभाचे स्थान म्हणतात. या काळात तुमचे उत्पन्न वाढू शकते. तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात.राजकारणाच्या क्षेत्रात केलेले प्रयत्नही यशस्वी होतील. व्यवसायात मोठा करार निश्चित केली जाऊ शकतो. हा करार भविष्यात तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. तुमची वेतनवाढ अनेक महिन्यांपासून प्रलंबित असल्यास यावेळी होऊ शकते.

वर्षातील पहिल्या सूर्य आणि चंद्र ग्रहणामुळे ‘या’ राशींना होणार फायदा, १५ दिवसात बदलेल नशिब!

मकर: केतूचे संक्रमण तुमच्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकते. कारण केतू तुमच्या राशीतून दहाव्या स्थानात प्रवेश करेल. या स्थानाला कर्म आणि नोकरीचे घर म्हणतात. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला प्रमोशन मिळू शकते. या काळात तुम्हाला व्यवसायात चांगला नफाही होऊ शकतो. नवीन व्यावसायिक संबंध निर्माण होऊ शकतात. दुसरीकडे, जर तुमचा व्यवसाय तेल, पेट्रोलियम, लोह इत्यादींशी संबंधित असेल तर तुम्ही चांगले पैसे कमवू शकता.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ketu gochar 2022 in tula rashi rmt