Ketu Gochar 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, केतु ग्रहाला छाया ग्रह सुद्धा मानतात. हा एक असा ग्रह आहे जो मुळात त्याचा प्रभाव सर्वत्र दिसून येतो. अन्य ग्रहाप्रमाणए हा केतु ग्रह सुद्धा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. केतुला एका राशीतून दुसऱ्या राशीत परिवर्तन करण्यासाठी १८ महिन्यांचा कालावधी लागतो. (Ketu Gochar 2025 after 18 years three zodiac signs will get good salary new job and money)

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

केतु ग्रह हा सध्या कन्याराशीमध्ये गोचर करणार आहे. या वर्षी मे महिन्यात सिंह राशीमध्ये प्रवेश करणार आहे. या गोचर मुळे अन्य राशींचे भाग्य बदलू शकते. जाणून घेऊ या त्या कोणत्या राशी आहेत.

धनु राशी (Dhanu Zodiac)

ज्योतिषशास्त्रानुसार, या राशीच्या लोकांसाठी केतु गोचर अत्यंत फायदेशीर ठरू शकतो. या लोकांचे मे महिन्यात नशीब बदलू शकते. यांना नशीबाची साथ मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा सुवर्ण काळ आहे. या लोकांची प्रमोशनसह पगारवाढ होऊ शकते. आपले आरोग्य उत्तम राहीन. या लोकांच्या घरात शुभ किंवा मांगलिक कार्यक्रम होऊ शकतो. या लोकांना विदेशात फिरायला जाण्याची संधी मिळू शकते.

वृश्चिक राशी (Scorpio Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी केतु ग्रहाचे राशी परिवर्तन फायद्याचे ठरू शकते. या राशीचे लोक जर जॉब बदलण्याचा विचार करत असेल तर त्यांच्यासाठई मे महिन्यानंतरचा काळ उत्तम आहे. या लोकांचा चांगल्या पॅकेजची नोकरी मिळू शकते. नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांना चांगल्या ठिकाणी नोकरी मिळू शकते. या लोकांचा पगार वाढ होऊ शकतो ज्यामुळे यांची आर्थिक स्थिती सुधारू शकते. या लोकांना मेहनतीचे फळ मिळेन.

मिथुन राशि (Mithun Zodiac)

मिथुन राशीच्या लोकांच्या कुंडलीमध्ये केतु ग्रह तिसऱ्या भावात प्रवेश करत आहे. यामुळे बहिण भावाचे नाते आणखी दृढ होऊ शकते. या गोचरमुळे या लोकांना जुन्या गुंतवणूकीतून मोठा लाभ होऊ शकतो. या लोकांचा पगार वाढेन. पैसा कमावण्याचे नवीन स्त्रोत निर्माण होऊ शकतात. कुटुंबातील सदस्यांबरोबर फिरायला जाऊ शकतात.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ketu gochar 2025 after 18 years three zodiac signs will get good salary new job and money ndj