Budh- Shukra Gochar: वर्षाचा दुसरा महिना सुद्धा आता समाप्तीच्या वाटेवर आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला व अंताला ग्रहांची मोठी उलाढाल होण्याची शक्यता असते. या महिन्यातही सरतेशेवटी म्हणजेच २७ फेब्रुवारीला ग्रहणाचा राजकुमार बुध देव हे कुंभ राशीत प्रवेश घेणार आहेत. तर १५ फेब्रुवारीला अगोदरच शुक्राचे मीन राशीत परिवर्तन झाले आहे. या दोन्ही गोचारांच्या संयोगाने ज्योतिषीय लक्ष्मी राजयोग तयार होत आहे. या राजयोगाने ४ राशींच्या गोचर कुंडलीत अत्यंत लाभदायक प्रभाव दिसून येऊ शकतो. या मंडळींना येत्या काळात केवळ आर्थिकच नव्हे तर करिअरच्या दृष्टीने सुद्धा मोठ्या संधी लाभू शकतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कुंडलीत लक्ष्मी राजयोग कसा तयार होतो?

ज्योतिषांच्या अभ्यासानुसार, प्रत्येक राशीच्या गोचर कुंडलीत १२ स्थाने असतात यातील नववे व दहावे स्थान अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते. हे स्थान भाग्य व कर्माचे प्रतिनिधी आहे. या दोन्ही स्थानावर जेव्हा एखाद्या ग्रहाचा प्रभाव सुरु होतो तेव्हा धनलाभाचे प्रबळ योग असतात. इथे जर दोन ग्रहांची युती झाली तर आर्थिक लाभासह आपल्याला प्रगतीची संधी सुद्धा चालून येऊ शकते. जेव्हा या दोन स्थानावर एखादा राजयोग तयार होती तेव्हा त्या व्यक्तीच्या आयुष्यात सर्व कर्माची गोड फळे मिळण्यास सुरुवात होते असे मानले जाते. येत्या २७ फेब्रुवारीपासून बुध व शुक्र एकमेकांच्या जवळ आल्याने ४ राशींच्या कुंडलीत असाच शुभ राजयोग तयार होत आहे. या भाग्यवान राशी कोणत्या हे आता पाहुयात..

बुध- शुक्र युतीने ‘या’ राशींना मिळेल बक्कळ पैसा?

मीन (Pisces Zodiac Horoscope)

मीन राशीत शुक्र गोचर झाल्याने अगोदरच या मंडळींचे सुखाचे दिवस सुरु झालेले असू शकतात पण २७ फेब्रुवारीला जेव्हा बुध ग्रह कुंभ राशीत येईल तेव्हा त्यांना मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. समाजातील तुमचा मान-सन्मान वाढीस लागू शकतो. गुंतवणुकीतून बक्कळ धनलाभ होऊ शकतो. येत्या काळात वाहन व प्रॉपर्टी खरेदीसाठी योग्य वेळ आहे पण तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊन गुंतवणूक केल्यास अधिक फायदा होऊ शकतो.

धनु (Sagittarius Zodiac Horoscope)

धनु राशीचं मंडळींसाठी बुध व शुक्राची युती हे एक वरदान सिद्ध होऊ शकते. आपल्या राशीवरील शनीची साडेसाती नुकतीच संपली आहे. अशातच हा शुभ योग बनल्याने प्रगती व कमाईचा वेग दिवसागणिक वाढू शकतो. कौटुंबिक सुख लाभू शकते. कोर्ट व कायद्याच्या संबंधित प्रलंबित कामे मार्गी लागण्यास मोठी मदत होऊन शकते. तुम्हाला आई- वडिलांच्या कमाई व गुंतवणुकीचा सुद्धा काही अंशी फायदा होण्याची चिन्हे आहेत.

कन्या (Virgo Zodiac Horoscope)

कन्या रास येत्या काळात सर्वोतोपरी समृद्ध होण्याची पूर्ण चिन्हे आहेत.कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून तुमची पाठ थोपटली जाऊ शकते. एवढेच नव्हे तर तुम्हाला पदोन्नतीसह पगारवाढीचा सुद्धा योग आहे. आपल्या वाणीवर नियंत्रण व कामात प्रामाणिकपणा कमी पडणार नाही याची पूर्ण खबरदारी घ्यावी लागेल. जोडीदाराकडून एखादे मोठे सरप्राईज मिळण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा<< महाशिवरात्री व अन्य महिन्यातील शिवरात्री यांच्यात आहे ‘हा’ मोठा फरक; ज्योतिष तज्ज्ञ सांगतात, “याच दिवशी..”

मिथुन (Gemini Zodiac Horoscope)

मिथुन रास एकाअर्थी २०२३ मधील सर्वात नशीबवान रास म्हणून ओळखली जाऊ शकते. या वर्षात शनिदेव आपल्या राशीतून गेल्याने साडेसाती संपुष्टात आली आहे. शुक्र आपल्या राशीच्या कर्म व भाग्य भावी स्थिर झाल्याने तुम्हाला प्रत्येक कामातून प्रगतीचा योग आहे. तुम्ही सुरु केलेले काम मार्गी लावण्यावर भर द्या. शेअर मार्केट गुंतवणुकीसाठी तज्ज्ञांच्या सल्ल्याने सुरूवात केल्यास येत्या काळात प्रचंड लाभ होण्याची संधी आहे.

(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lakshmi rajyog after years with mercury venus transit four zodiac signs to get more money become rich by march 2023 svs