सोमवारच्या दिवशी शिवलिंगावर गायीचे दूध अर्पण करून ‘ॐ नमः शिवाय’ मंत्राचा जप केल्याने भगवान शंकराची विशेष कृपा होते, असे मानले जाते. शास्त्रात या मंत्राला अत्यंत शक्तिशाली आणि चमत्कारी म्हटले गेले आहे. अशी मान्यता आहे की ‘ॐ नमः शिवाय’ मंत्राचा जप केल्याने सर्व समस्या दूर होऊ शकतात. शिवपुराणात या मंत्राला सर्व मनोकामना पूर्ण करणारा मंत्र म्हटले आहे. आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने आपण या मंत्राबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘ॐ नमः शिवाय’ मंत्राचा अर्थ

हिंदू धर्मात ‘ॐ नमः शिवाय’ला पंचाक्षर म्हटले जाते. तसेच, याला पाच तत्त्वांचे प्रतीक मानले जाते. शिवपुराणानुसार, वामदेव या मंत्राचा ऋषी आहे आणि शिव स्वतः त्याची देवता आहे. ‘ॐ नमः शिवाय’ हा एक महामंत्र आहे. या मंत्राला शरणाक्षर मंत्र देखील म्हटले जाते, कारण तो प्रलव मंत्र ॐ आणि नमः शिवाय पंचाचार मंत्राच्या संयोगाने तयार होतो. असे म्हटले जाते, ‘ॐ नमः शिवाय’ या मंत्राच्या महत्त्वाचे योग्य वर्णन शंभर कोटी वर्षातही होणे संभव नाही. ‘ॐ नमः शिवाय’ मंत्राचा अर्थ द्वेष, तृष्णा, स्वार्थ, लोभ, मत्सर, वासना, क्रोध, आसक्ती, माया आणि मद यापासून मुक्त होऊन प्रेम आणि आनंदाने भगवंताचा आशीर्वाद घेणे.

Mahashivratri 2022 : महाशिवरात्रीच्या निमित्ताने जाणून घेऊया रुद्राक्षाच्या उत्पत्तीची कथा, प्रकार आणि फायदे

‘ॐ नमः शिवाय’ मंत्राचा जप करण्याची विधी

  • तुम्ही सूर्योदय आणि सूर्यास्त या दोन्ही वेळी भगवान शिवाच्या या प्रभावी मंत्राचा जप करू शकता.
  • शास्त्रानुसार शिवमंदिर, तीर्थक्षेत्र किंवा घरामध्ये स्वच्छ, शांत आणि निर्जन ठिकाणी बसून या मंत्राचा जप करावा.
  • रुद्राक्षाची माळ घेऊन ‘ॐ नमः शिवाय’ या मंत्राचा दररोज जप करा.
  • या मंत्राचा दररोज किमान १०८ वेळा जप करणे शुभ मानले जाते.
  • नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून जप करा.
  • पवित्र नदीच्या काठी शिवलिंगाची स्थापना आणि पूजा केल्यानंतर जप केल्यास त्याचे उत्तम फळ मिळते, असे म्हटले जाते.
  • या मंत्राचा जप नेहमी योग मुद्रामध्ये बसून करावा.
  • या मंत्राचा जप केल्याने सर्व इंद्रिये जागृत होतात असे म्हणतात.
  • असे मानले जाते की या मंत्राचा जप केल्याने धार्मिक फायद्यांसोबतच आरोग्यालाही लाभ होतो.

Mahashivratri 2022 : जाणून घ्या रुद्राक्ष कधी आणि कोणी धारण करू नये

‘ॐ नमः शिवाय’ मंत्राचा जप करण्याचे फायदे

  • असे म्हटले जाते की या मंत्राचा जप केल्याने धन आणि शत्रूंवर विजय प्राप्त होतो.
  • संततीप्राप्तीसाठीही या मंत्राचा जप केला जातो, असे मानले जाते.
  • असे मानले जाते की या मंत्राचा जप केल्याने सर्व त्रास आणि दु:ख दूर होतात आणि महाकालाची अपार कृपा व्यक्तीवर राहते.
  • या मंत्राचा जप केल्याने सर्व प्रकारचे अडथळे दूर होतात असे मानले जाते.
  • असे म्हटले जाते की या मंत्राचा जप केल्याने व्यक्तीला जीवन चक्राचे रहस्य समजू शकते. तसेच मोक्षप्राप्तीसाठी या मंत्राचा जप केला जातो. ॐ या शब्दातच त्रिदेवांचा वास मानला जातो.

(येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Learn the meaning effect and significance of the mantra om namah shivaya pvp