शिवशंकराच्या भक्तासाठी, शैव परंपरेतील अनुयायांसाठी महाशिवरात्र (Maha Shivratri) हा सण खूप महत्त्वपूर्ण असतो. प्रत्येक महिन्यातल्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीयुक्त चतुर्दशीला शिवरात्री असते. पण माघ महिन्यातील महाशिवरात्रीची माघ कृष्ण चतुर्दशी तिथी खास असते, या तिथीला महादेवांनी तांडव नृत्य केले होते अशी आख्यायिका आहे. उत्तर भारतात हाच दिवस फाल्गुन महिन्यात गणला जातो. या सणाला भक्तगण उपवास करतात आणि रात्रभर शंकराची आराधना करतात. पुढे दुसऱ्या दिवशी पूजा करुन मग उपवास सोडतात.
या तिथीला पंचगव्य म्हणजे गायीचे दूध, तूप, शेण, गोमूत्र आणि दही लावून शिवलिंगाला अभिषेक केला जातो. त्यानंतर दूध, दही, तूप, मध आणि साखर या पंचामृताचा लेप शिवलिंगावर लावतात. त्यासह धोत्रा, बेलाची पानेही वाहिली जातात. काही ठिकाणी प्रसाद म्हणून भांगचे सेवन केले जाते. २०२३ मध्ये हा सण १८ फेब्रुवारी रोजी साजरा होणार आहे. Read More
विषबाधा झालेल्या नागरिकांवर नागपुरातील मेडिकल, मेयो या दोन्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासह इतरही शासकीय व खासगी रुग्णालयांत उपचार करण्यात…
शेकडो वर्षांपासून जागतिक किर्तीच्या घारापुरी बेटावर महाशिवरात्री निमित्ताने हजारो शिवभक्त बम…बम… भोलेच्या जोरदार घोषणा देत येतात. बेटावर येणाऱ्या हजारो भाविकांनी…
मध्य आणि कोकण रेल्वे प्रशासनाने महाशिवरात्रीनिमित्त एक दिवस आधी विशेष रेल्वेगाडी सोडण्याची घोषणा केली असून नियमित रेल्वेगाड्यांची प्रतीक्षायादी ३००-४००पर्यंत पोहचली…
Mahashivratri 2024 History Significance लहान महादेव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ढगा या तीर्थक्षेत्रावर महाशिवरात्रीस भरणाऱ्या यात्रेत विदर्भभरातून गर्दी उसळते.