Astrology Today: आज ३ फेब्रुवारी २०२५ (सोमवार) रोजी माघ महिन्यातील शुक्ल पक्षाची षष्ठी तिथी असून आज रेवती नक्षत्र जागृत असेल. आजचा राहूकाळ सकाळी ७ वाजून ३० ते सकाळी ९ पर्यंत असेल. आजचा अभिजित मुहूर्त दुपारी १२ वाजून १० मिनिटांपासून दुपारी १२ वाजून ५३ मिनिटांपर्यंत असेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हिंदू धर्मामध्ये आजचा सोमवारचा दिवस भगवान महादेवाला समर्पित असून हा दिवस १२ राशींपैकी एका राशीसाठी अत्यंत अनुकूल सिद्ध होईल.

सिंह राशीच्या व्यक्तींना कसा जाईल आजचा दिवस (How will today be for Leo people?)

सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस खूप आनंदात आणि उत्साहात जाईल. नवनवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. नवे लोक, मित्रमैत्रिणी भेटतील. तुमच्यातील उत्साह तुम्हाला यश मिळवून देईल. नोकरीत यश मिळेल. तुमच्या हातात नवीन अधिकार येतील. मुलांचा अभिमान वाटेल. सामाजिक प्रतिमा सुधारेल. ज्यावेळी इतरांनी मदत करावी अशी अपेक्षा असते त्यावेळी ती मदत मिळत नाही. नोकरदार वर्गाला वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळेल. आर्थिक बाबतीत समाधानाची बाब राहील. धार्मिक गोष्टींची आवड राहील. आनंदयात्रा घडेल. भावंडांशी हितगुज साधाल. मानसिक शारीरिक स्वास्थ्य लाभेल.

सिंह राशीचे आजचे आर्थिक राशिभविष्य (Astrology Predictions: Leo Finance Horoscope Today)

आजच्या दिवशी आर्थिक परिस्थिती उत्तम असेल. परंतु खर्चावर नियंत्रण ठेवा. चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक करण्याआधी अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या.

सिंह राशीचे करिअरविषयीचे राशिभविष्य (Astrology Predictions: Leo Career Horoscope Today)

आजच्या दिवशी सिंह राशीच्या व्यक्तींच्या व्यवसायात खरेदी-विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणात होतील. फायद्याचे प्रमाण हे चांगले असेल. नोकरदार वर्गाला नवीन संधी मिळेल. आर्थिक लाभ होईल. राजकीय क्षेत्रात यश मिळेल. व्यावसायिक गणित चांगले जमेल. मात्र व्यवहार जपून करा.

सिंह राशीचे आजचे प्रेमविषयाचे राशिभविष्य (Astrology Predictions: Leo Love Horoscope Today)

सिंह राशीच्या व्यक्तींच्या प्रेमसंबंधांमध्ये चांगले बदल पाहायला मिळतील. आजचा दिवस तुमच्या जोडीदाराबरोबर व्यतीत कराल. नाते अधिक घट्ट होईल. परंतु जोडीदाराबरोबर बोलताना वाणीवर नियंत्रण ठेवा, नाहीतर गैरसमज होण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Leo horoscope today 3 february 25 daily astrology prediction for leo career finance money and love sap