हिंदू धर्मात महाशिवरात्री हा महत्वपूर्ण सण आहे. भोलेनाथ म्हणजेच शिव स्वतः चतुर्दशी तिथीचे स्वामी आहेत. म्हणूनच प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी ही मासिक शिवरात्री म्हणून साजरी केली जाते. महिलांसाठी शिवरात्रीच्या व्रताला विशेष महत्त्व आहे. अविवाहित स्त्रिया त्यांच्या पतीसाठी भगवान शिवाची प्रार्थना करतात, तर विवाहित महिला त्यांच्या पती आणि कुटुंबासाठी प्रार्थना करतात.
पौराणिक मान्यतेनुसार, माता पार्वतीने भगवान शिवांना विचारले होते की, तुम्हाला कोणती गोष्ट सर्वात जास्त आवडते, तेव्हा भगवान शिव म्हणाले होते की जो भक्त श्रद्धेने व्रत करेल त्यावर प्रसन्न होईल. या दिवशी भक्त आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी शिवालयात जलाभिषेक आणि पूजा करतात आणि भगवान शंकराच्या कृपेसाठी प्रार्थना करतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिषेकसाठी थाळी अशा प्रकारे सजवा: महाशिवरात्रीसाठी प्रत्येकाची तयारी सुरु आहे. पण तुम्ही काही विसरत असाल तर ही यादी एकदा वाचा. महाशिवरात्रीला शिवाला अभिषेक करण्यासाठी दूध, दही, साखर, गंगाजल, बेलपत्र, फळे, फुले, कच्चा तांदूळ, पांढरे तीळ, मूग, सातू, धूपबत्ती, चंदन, मध, तूप, अत्तर, केशर, धतुरा, रुद्राक्ष, ऊस किंवा त्याचा रस आणि राख याचा समावेश करा.

महाशिवरात्रीचा शुभ मुहूर्त ३ वाजून १६ मिनिटांपासून सुरू होईल आणि बुधवार, २ मार्च रोजी सकाळी १० वाजेपर्यंत असेल. रात्रीची पूजा संध्याकाळी ६ वाजून २२ मिनिटांनी ते रात्री १२ वाजून ३३ मिनिटांपर्यंत चालणार आहे. शिवरात्रीच्या रात्री चार पहर पूजा केली जाते.

महाशिवरात्री चार प्रहर पूजाविधी वेळ

  • पहिला प्रहर: १ मार्च २०२२ संध्याकाळी ६ वाजून २१ मिनिटांपासून रात्री ९ वाजून २७ मिनिटांपर्यंत
  • दुसरा प्रहर: १ मार्च २०२२ रात्री ९ वाजून २७ मिनिटे ते १२ वाजून ३३ मिनिटे
  • तिसरा प्रहर: १ मार्च रात्री १२ वाजून ३३ मिनिटे ते पहाटे ३ वाजून ३९ मिनिटे
  • चौथा प्रहर: २ मार्च पहाटे ३ वाजून ३९ मिनिटे ते सकाळी ६ वाजून ४५ मिनिटे
  • व्रताची शुभ मुहूर्त: २ मार्च २०२२, बुधवार संध्याकाळी ६ वाजून ४६ मिनिटांपर्यंत राहील

शिवलिंगावर या वस्तू अर्पण करू नका: भगवान शंकराला तुळशीची पाने कधीही अर्पण करू नयेत असा शास्त्रात उल्लेख आहे. भगवान शंकराला तुळशी अर्पण केल्याने नाराज होतात. पॅकेटमधील दुधाने अभिषेक करू नका. तसेच शिवलिंगावर फक्त थंड दूध आणि गंगाजल मिसळूनच अर्पण करावे हे लक्षात ठेवा. या दिवशी तुटलेला तांदूळ म्हणजेच तुटलेला अक्षत शिवलिंगाला अर्पण करू नये. विकृत बेलची पाने देऊ नका. यासोबतच शिवलिंगावर कुंकुम तिलक लावणेही निषिद्ध आहे.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maha shivrastri these not offer on shivling know rmt