Mahalaxmi Rajyog 2025: ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र एकमेव असा ग्रह आहे जो सर्वात वेगवान गतीने एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. तो एका राशीमध्ये जवळपास अडीच दिवस राहतो. त्यामुळे बऱ्याचदा काही राशींमध्ये चंद्राची दुसऱ्या ग्रहाबरोबर युती निर्माण होते. या युतीचा काही राशींच्या व्यक्तींवर शुभ तर काही राशींवर अशुभ परिणाम पाहायला मिळतो. येत्या काही तासांमध्ये चंद्र मंगळ ग्रहाबरोबर महालक्ष्मी राजयोग निर्माण करत आहे. हा योग काही राशींसाठी अत्यंत लाभदायी सिद्ध होईल.
पंचांगानुसार, ग्रहांचा सेनापती मंगळ ग्रह सध्या कर्क राशीत विराजमान असून ३ एप्रिल २०२५ रोजी चंद्र कर्क राशीत प्रवेश करणार आहे. ग्रह विराजमान आहे. त्यामुळे मंगळ आणि चंद्राची ही युती काही राशींच्या आयुष्यात अनेक नवे बदल पाहायला मिळतील.
‘या’ तीन राशींवर महालक्ष्मी राजयोगाचा प्रभाव
कर्क (Cancer)
कर्क राशीच्या व्यक्तींना महालक्ष्मी योगामुळे खूप शुभ परिणाम पाहायला मिळतील. आर्थिक समस्या दूर होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवी संधी मिळेल.
कन्या (Virgo)
कन्या राशीच्या व्यक्तींना महालक्ष्मी राजयोगाचा शुभ प्रभाव अत्यंत अनुकूल सिद्ध होईल. या काळात नोकरी, व्यवसायात प्रगती होईल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. कुटुंबीयांसोबत फिरायला जाल.अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील.
वृश्चिक (Scorpio)
महालक्ष्मी राजयोगाचा प्रभाव वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी लाभदायी सिद्ध होईल. धार्मिक कार्यात मन रमेल. नोकरी, व्यवसायात प्रगती होईल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. आई-वडिलांचा आशीर्वाद तुमच्या पाठिशी असेल. कुटुंबीयांसोबत फिरायला जाल. तुमची इच्छा शक्ती मजबूत होईल.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
© IE Online Media Services (P) Ltd