Capricorn Shani SadeSati: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या राशी परिवर्तनाचा, शुभ-अशुभ योगांचाही चांगला-वाईट प्रभाव १२ राशींवर पडतो. तसेच सर्वात कष्टदायी मानली जाणारी शनीची साडेसातीही १२ राशींच्या व्यक्तींवर प्रभाव पाडते. जेव्हा शनी एखाद्या राशीच्या दुसऱ्या किंवा १२ व्या घरात असतो, तेव्हा त्या राशीवर शनीची साडेसाती सुरू होते. ही साडेसाती अडीच वर्षाच्या तीन टप्प्यांमध्ये असते. म्हणजेच एकूण साडेसात वर्ष असते. म्हणून तिला साडेसाती असे म्हटले जाते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, २९ मार्च रोजी शनी कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहे. तसेच या दिवशी साडेसात वर्ष (२०१७ ते २०२५) सुरू असलेली मकर राशीची साडेसाती संपणार आहे. त्यामुळे मकर राशीसह काही राशींवर शनीचा शुभ प्रभावही पाहायला मिळेल.

‘या’ राशींवर होणार शनीची कृपा

वृषभ

मकर राशीच्या साडेसातीचा तिसरा टप्पा संपताच शनीचा वृषभ राशीवरही शुभ प्रभाव पाहायला मिळेल. या काळात तुमच्या आर्थिक आणि भौतिक सुखात वाढ होईल. तुमचे प्रेमसंबंध चांगले होतील, नात्यात गोडवा येईल. कामाच्या ठिकाणी दिले गेलेले लक्ष्य पूर्ण कराल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील.

मिथुन

मकर राशीची साडेसाती संपताच मिथुन राशीच्या व्यक्तींनाही त्याचे शुभ परिणाम अनुभवा येतील. या काळात तुम्हाला अचानक धनलाभ होईल आणि अडकलेले पैसे परत मिळतील. नोकरीत पदोन्नती होऊ शकते. समाजात मान-सन्मान वाढेल. या काळात तुम्ही नेहमी सकारात्मक राहाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. जोडीदाराला वेळ द्याल. मानसिक तणावातून मुक्त रहाल. आयुष्यात आनंदी आनंद असेल.

मकर

मकर राशीच्या व्यक्तींसाठी साडेसातीचा काळ खूप कष्टदायक होता. त्यामुळे इथून पुढचा काळ तुमच्यासाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. तुमच्या मनातील सकारात्मक इच्छा पूर्ण होतील. धार्मिक कार्यात मन रमेल. आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान-सन्मान वाढेल. या काळात भाग्याची साथ मिळेल. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल, आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे.

(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Makar rashi shani sadesati end three zodic get happy life and more money sap