Mangal Make Kuldeepak Rajyog: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन किंवा नक्षत्र परिवर्तन करतो ज्याचा शुभ प्रभाव १२ पैकी काही राशींवर शुभ तर काही राशींवर अशुभ प्रभाव पडतो. ज्योतिषशास्त्रात मंगळ ग्रहाला साहस, ऊर्जा आणि पराक्रमाचा कारक ग्रह म्हणून ओळखले जाते. सध्या मंगळ ग्रह तूळ राशीत विराजमान असून सध्या मंगळाचे अंश बळ कमी आहे. परंतु २८ सप्टेंबर रोजी मंगळाचे अंश ९ डिग्री होईल ज्यामुळे मंगळ आपली उच्च राशी असलेल्या मकर राशीत ‘कुलदीपक राजयोग’ निर्माण करेल.
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, कुलदीपक राजयोग मंगळ ग्रहाच्या स्थितीमुळे निर्माण होतो. जेव्हा मंगळ दहाव्या भावात आपली उच्च राशी किंवा आपल्या राशीत असेल तर हा राजयोग निर्माण होतो. सध्या मंगळ तूळ राशीत असून तो मकर राशीच्या दशम भावात आहे. हा राजयोग काही राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत अनुकूल सिद्ध होईल.
राजयोगाचा तीन राशींवर शुभ प्रभाव
मेष (Mesh Rashi)
मेष राशीच्या व्यक्तींसाठी हा राजयोग अत्यंत अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमचे भाग्य रातोरात चमकेल. आर्थिक समस्या दूर होण्यास मदत होईल. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल.
कर्क (Kark Rashi)
कर्क राशीच्या व्यक्तींसाठी हा राजयोग अत्यंत अनुकूल सिद्ध होईल. या काळात नोकरी, व्यवसायात प्रगती होईल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. कुटुंबीयांसोबत फिरायला जाल.अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील.
मकर (Makar Rashi)
कुलदीप राजयोगाच्या शुभ प्रभावाने मकर राशीच्या व्यक्तींचे धार्मिक कार्यात मन रमेल. नोकरी, व्यवसायात प्रगती होईल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. आई-वडिलांचा आशीर्वाद तुमच्या पाठिशी असेल. कुटुंबीयांसोबत फिरायला जाल.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)