Mangal Margi and Budh Rise: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे वेळोवेळी राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तनही होते. ज्याचा शुभ प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. नवग्रहात ग्रहांचा सेनापती मंगळ ग्रह २४ फेब्रुवारी रोजी मार्गी होणार आहे. तसेच ग्रहांचा राजकुमार बुध ग्रहाचा २ एप्रिल रोजी उदय होणार आहे. ज्याचा शुभ प्रभावाने काही राशींच्या व्यक्तींना शुभ परिणाम पाहायला मिळतील.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या तीन राशीच्या व्यक्तींचे भाग्य चमकणार

वृषभ

वृषभ राशीसाठी मंगळ ग्रहाचे मार्गी होणे आणि बुध ग्रहाचा उदय अत्यंत अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमचे भाग्य चमकेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी सहकार्यांकडून मदत मिळेल. अचानक धनलाभ होईल. शत्रूंवर विजय मिळवाल. तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळेल. या काळात नोकरीत हवे तसे यश मिळवाल. मनातील सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. या काळात आई-वडील आणि तुमच्या गुरूंचा आर्शीवाद तुमच्या पाठीशी असेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. आई-वडिलांबरोबरचे नातेसंबंध चांगले होतील.

मिथुन

मिथुन राशीच्या व्यक्तींना मंगळ आणि बुधाची स्थितीतील बदल खूप फायदेशीर ठरतील. या काळात तुमच्या कामातील सर्व अडचणी दूर होतील आणि आयुष्यात आनंदी आनंद संचारेल. अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. आकस्मिक धनलाभ होईल. आयुष्यात सुख-शांती येईल. मनातील सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. या काळात आई-वडील आणि तुमच्या गुरूंचा आर्शीवाद तुमच्या पाठीशी असेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी सहकार्यांकडून मदत मिळेल. तणाव दूर होण्यास मदत मिळेल.

धनु

धनु राशीसाठीही दोन्ही ग्रहांच्या स्थितीतील बदल फायदेशीर ठरतील. ठरेल. या काळात तुमचे प्रेमसंबंध मजबूत होतील. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवी नोकरी मिळेल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा सहज पूर्ण होतील. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नोकरी मिळण्याचे योग आहेत. व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. काळात अचानक धनलाभ, भौतिक सुखाची प्राप्ती होईल. कामाच्या ठिकाणी चांगली संधी प्राप्त होईल. अनेक दिवसांपासून अडकलेले कामही पूर्ण होण्यास मदत मिळेल. नात्यांमध्ये गोडवा निर्माण होईल.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mangal margi and budh rise these three zodiac signs will earn money wealth and new job sap