Mangal gochar 2025: ज्योतिषशास्त्रात मंगळ ग्रहाला साहस, पराक्रम, शौर्य, क्रोध, भूमी यांचा कारक ग्रह मानले जाते. त्यामुळे ज्या व्यक्तीच्या पत्रिकेत मंगळ शुभ स्थितीत असतो, असे लोक प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवण्यासाठी सक्षम असतात. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका निश्चित काळानंतर राशी परिवर्तन करतो. अनेकदा याचा फायदा काही राशींच्या व्यक्तींना होतो. मंगळ २२ महिने एका राशीत राहतो आणि त्यानंतर दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. सध्या मंगळ तूळ राशीमध्ये विराजमान असून येत्या २७ ऑक्टोबर २०२५ रोजी तो स्वराशी असलेल्या वृश्चिक राशीमध्ये प्रवेश करेल. मंगळाचे हे राशी परिवर्तन काही राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत लाभदायी सिद्ध होईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मंगळ देणार साहस आणि आत्मविश्वास

मिथुन

मिथुन राशीच्या व्यक्तींवर मंगळाची कृपा होईल. ज्याच्या प्रभावाने या व्यक्तींचा साहस, पराक्रम वाढेल. या काळात त्यांची आर्थिक स्थिती उत्तम राहून, कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. वैवाहिक जीवन सुखमय असेल. आत्मविश्वासही वाढेल. अविवाहितांची लग्ने जुळतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींच्या मेहनतीचे कौतुक होईल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. केवळ कामात कोणताही हलगर्जीपणा करू नका.

कन्या

कन्या राशीच्या व्यक्तींनादेखील मंगळाच्या राशी परिवर्तनाचा चांगला फायदा होईल. या काळात तुमच्या सुख-सुविधा आणि भौतिक सुखामध्ये वाढ होईल. नव्या वस्तू खरेदी कराल. नोकरीत प्रमोशन मिळेल. मुलांकडून आनंदी वार्ता येतील. कुटुंबातही आनंदी आनंद असेल. स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. करिअरमध्ये चांगली प्रगती होईल. धार्मिक कार्यात मन रमेल.

हेही वाचा: नुसता पैसाच पैसा! गुरूच्या नक्षत्र परिवर्तनाने ‘या’ तीन राशीचे व्यक्ती होणार गडगंज श्रीमंत

वृश्चिक

मंगळ वृश्चिक राशीचा स्वामी ग्रह असल्याने हे राशी परिवर्तन वृश्चिक राशीसाठी शुभ फळ देणारे असेल. या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील. प्रत्येक कामात कुटुंबीयांची साथ मिळेल. तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. दूरचे प्रवासही घडतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. आरोग्य उत्तम राहिल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. नवे लोक, नवे छंद यांच्याशी जोडले जाल. शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम असेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल.

(टीप: सदर लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mars gochar 25 people of these three zodiac signs will get new job and success in every work sap