लग्नापूर्वी कुंडली जुळवणे हिंदू धर्मात खूप महत्वाचे मानले जाते. कधी कधी कुंडली जुळत नसल्याने चांगली स्थळे हातातून गमवावी लागतात. कारण कुंडली जुळत नसल्यामुळे मुला-मुलीला भविष्यात अनेक समस्यांना सामोरे जाण्याची शक्यता असते, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. उदाहरणार्थ, स्वभाव न जुळणं, अपघात किंवा लग्नानंतर कोणतेही मोठे नुकसान होणं, अपत्य सुखाचा अभाव किंवा इतर कोणत्याही कारणामुळे नाते तुटते. आजकाल लोकं सॉफ्टवेअर किंवा मोबाईल अ‍ॅपद्वारे कुंडली जुळते की नाही ते पाहतात. मात्र असं पाहताना पुरसं ज्ञान नसल्यामुळे त्रास होऊ शकतो. तज्ज्ञांकडून कुंडली न पाहिल्याने जोडप्याच्या आयुष्यात समस्या निर्माण करु शकते. आजकाल घटस्फोटाची प्रकरणे खूप वाढली आहेत. यामागचे एक मोठे कारण म्हणजे कुंडली योग्य पद्धतीने न जुळणे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुणांसोबत ग्रह जुळणे देखील आवश्यक: वास्तविक, मोबाइल अ‍ॅप किंवा सॉफ्टवेअर केवळ गुणधर्मांशी जुळतात. मात्र ग्रहांची स्थिती किंवा दोष सांगत नाहीत. त्यामुळेच अनेक वेळा ३६ पैकी ३६ गुण जुळूनही जोडप्याला आनंदी राहता येत नाही. या दोषांचे निवारण केल्याशिवाय किंवा कुंडली योग्य पद्धतीने जुळविल्याशिवाय पुढे जाऊ नये. ग्रह दोषांच्या जुळणीला ग्रह जुळणी म्हणतात. चांगल्या वैवाहिक जीवनासाठी खूप महत्वाचे आहे.

विवाह भाव : कुंडलीतील सातव्या स्थानाला विवाह स्थान म्हणतात. या स्थानातून वैवाहिक सुख दिसते. या स्थानात कोणते ग्रह आहेत यावरून वैवाहिक सुखाचे मोजमाप करतो. हे घर खराब असेल किंवा त्यात काही दोष असेल तर गुण मिळाल्यावरही वैवाहिक जीवनात अडचणी येतात.

Astrology 2022: एक आठवड्यानंतर बुध ग्रहाचं संक्रमण; या राशींच्या लोकांना होणार फायदा

संतान भाव: कुंडलीत संतान भावात पापग्रह किंवा दोष असेल तर दाम्पत्य संतती सुखापासून वंचित राहते.

आयु भाव: हे घर त्या व्यक्तीचे वय सांगते. आयु भावात लवकर मृत्यूचा योग असेल आणि त्या व्यक्तीशी लग्न झाले, तर खूप दु:ख होते.

लग्न भाव: लग्न भावातील दोष व्यक्तीची समाजात वाईट प्रतिमा निर्माण करते. अशा व्यक्तीशी लग्न केल्याने नुकसानच होते.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Matching horoscopes with software or mobile app is not enough for marriage rmt
First published on: 28-01-2022 at 14:07 IST