वैदिक ज्योतिषात, बुध ग्रह हा बुद्धिमत्ता, संवाद आणि जीवनातील व्यवस्थापनाचा करक ग्रह मानला जातो. प्रत्येक ग्रह ठराविक कालावधीनंतर मार्गस्थ किंवा वक्री होत असतो. मार्गी म्हणजे सरळ चालणे आणि वक्री म्हणजे उलटे चालणे. बुध ग्रह वर्षातून सुमारे तीनवेळा वक्री असतो. २०२२ या वर्षात बुध ग्रहाच्या पहिल्या वक्री चालीचा अवधी २१ दिवसांचा आहे. १४ जानेवारी ते ४ फेब्रुवारी या काळात बुध ग्रह मकर राशीत वक्री आहे. ४ फेब्रुवारी, शुक्रवारी सकाळी ९ वाजून १६ मिनिटांनी बुध शनिदेवाच्या कुंभ राशीत असेल. अशा परिस्थितीत बुधाचे हे संक्रमण आत्मविश्वास आणि विश्लेषणात्मक क्षमता वाढवेल. बुध ग्रह गुरू, शुक्र, सूर्य आणि चंद्र यांच्याशी जोडल्यास शुभ फळ मिळतात. तर राहू-केतू, मंगळ आणि शनि त्यांच्या स्वभावानुसार अशुभ फळ देतात. चला जाणून घेऊया कोणत्या राशींसाठी बुध ग्रहाचा संक्रमण शुभ आहे.
मेष: मेष राशीच्या लोकांच्या कुंडलीत बुध हा त्यांच्या तिसऱ्या आणि सहाव्या स्थानाचा स्वामी आहे. या काळात तो तुमच्या अकराव्या भावात म्हणजेच इच्छा आणि लाभाच्या घरात असेल. या काळात परिस्थिती विस्तारासाठी आणि विकासासाठी चांगली सिद्ध होऊ शकते. कारण यावेळी तुमच्या यशाच्या अकराव्या घरात बुध उपस्थित असेल. या राशीचे लोक गुंतवणूक इत्यादींशी संबंधित काही मोठे निर्णय घेऊ शकतात, या काळात भावंड आणि मित्रांकडून सहकार्य मिळेल. तसेच, या काळात शुभ बातम्या मिळतील आणि यामुळे तुम्हाला मनापासून आनंद मिळेल.
वृषभ: वृषभ राशीच्या लोकांसाठी बुध हा दुसऱ्या आणि पाचव्या स्थानाचा स्वामी आहे. आता तुमच्या दहाव्या भावात जाणार आहे. या दरम्यान, उत्साह वाढेल आणि करिअरमध्ये चांगले यश मिळेल. तुम्ही तुमच्या ध्येयाकडे अधिक लक्ष केंद्रित कराल. वैयक्तिक जीवनाच्या बाबतीत, या काळात तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबतच्या तुमच्या नातेसंबंधावर सर्वाधिक लक्ष केंद्रित करावे लागेल. जर व्यापारी असाल तर या संक्रमणामुळे तुम्हाला चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे, यामुळे तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होतील.
Astrology 2022: १४१ दिवस वक्री अवस्थेत असणार कर्मदेवता शनिदेव; चार राशींच्या अडचणीत होणार वाढ
मिथुन: मिथुन राशीच्या लोकांच्या कुंडलीत बुध हा त्यांच्या लग्न आणि चौथ्या घराचा स्वामी मानला जातो. या काळात बुध गोचर करून त्यांच्या नवव्या भावात असेल. या काळात तुम्हाला नशिबाची साथ मिळेल आणि तुमच्या नशिबाच्या जोरावरच तुम्हाला चांगली संपत्ती वगैरे मिळू शकेल. पगारदार लोकांना प्रमोशन मिळू शकते. आर्थिकदृष्ट्या, तुम्हाला चांगले पैसे सहज मिळतील. कोणत्याही धार्मिक आणि आध्यात्मिक प्रवास होण्याची शक्यता आहे.