Mercury Transit October 2025: १६ ऑक्टोबर २०२५ रोजी संध्याकाळी नेमके ७:०८ वाजता, वाणी, व्यापार आणि बुद्धिमत्तेचे अधिपती असलेले बुधदेव विशाखा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. सध्या बुध स्वाती नक्षत्रात भ्रमण करीत आहे; परंतु आता विशाखेच्या दिशेने त्यांचा प्रवास सुरू होईल आणि २७ ऑक्टोबरपर्यंत ते तिथेच विराजमान राहतील.
ज्योतिषांच्या मते, विशाखा नक्षत्राचा तिसरा चरण हा स्वतः बुधच्या अधिपत्याखाली येतो. त्यामुळे हा गोचर (transit) अत्यंत प्रभावशाली ठरणार आहे. बुधाचा हा बदल विशेषतः तीन राशींच्या व्यक्तींच्या करिअर, नोकरी, व्यवसाय आणि आर्थिक क्षेत्रात अभूतपूर्व यश घेऊन येईल. पाहूया, कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी?
बुधदेवाच्या नक्षत्र प्रवेशामुळे ‘या’ राशींना मोठा फायदा!
मिथुन
मिथुन राशीचे स्वामी स्वतः बुध असल्यामुळे हा काळ अत्यंत शुभ आहे. नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन, नवी जबाबदारी किंवा विदेशी प्रोजेक्ट्स मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांसाठी हा काळ सोन्याची संधी घेऊन येणारा ठरु शकतो. नवीन करार, डील्स किंवा गुंतवणूक लाभदायक ठरू शकतात. विशेषतः लेखन, शिक्षण, मार्केटिंग आणि मीडिया क्षेत्रातील लोकांसाठी बुधाचा प्रभाव विलक्षण लाभदायक असेल. तुमच्या बुद्धिमत्तेचा आणि संवादकौशल्याचा लोकांवर जादुई प्रभाव पडेल आणि आर्थिक स्थितीतही मोठी सुधारणा होऊ शकेल.
कन्या
कन्या राशीचा अधिपतीसुद्धा बुधच असल्याने हा गोचर तुमच्या व्यावसायिक जीवनात स्थैर्य आणि प्रगतीचा नवा अध्याय उघडेल. ज्या योजनांवर तुम्ही बऱ्याच काळापासून मेहनत घेत आहात, त्यात आता यश मिळण्याचे संकेत आहेत.
व्यवसायात नवीन भागीदारी किंवा गुंतवणूक फायदेशीर ठरु शकेल. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून कौतुक मिळेल, तुमच्या निर्णयक्षमतेचा गौरव होईल आणि थांबलेली कामं पूर्ण होऊ शकतात. तुमची वाणी आणि वागणूक लोकांना प्रभावित करेल, ज्यामुळे प्रतिष्ठा आणि उत्पन्न दोन्हींमध्ये वाढ होऊ शकेल.
कुंभ
या गोचर काळात बुध कुंभ राशीवाल्यांना संवाद, नेटवर्किंग आणि स्ट्रॅटेजिक प्लॅनिंगमध्ये मोठं यश देणार आहे. सेल्स, पब्लिक रिलेशन, शिक्षण व काऊन्सिलिंग क्षेत्रातील व्यक्तींना करिअरमध्ये झपाट्याने वाढ होईल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत शुभ असून, इंटरव्ह्यू आणि मीटिंग्जमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. नवे संपर्क लाभदायक ठरतील आणि नोकरीत पदोन्नती किंवा बदल घडू शकतो.
थोडक्यात सांगायचं तर, बुधदेवाचा विशाखा नक्षत्रातील हा प्रवास काहींसाठी भाग्याची दारे उघडणारा ठरणार आहे.
करिअर, व्यवसाय आणि प्रतिष्ठेच्या क्षेत्रात या तीन राशींच्या लोकांचे नाव पुढे जाणार हे निश्चित.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. त्याच्या तथ्यांबद्दल लोकसत्ता कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोराही देत नाही.)