Trigrahi Yog In Makar Rashi: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह वेळोवेळी राशी परिवर्तन करत असतात ज्यामुळे शुभ-अशुभ योग तयार होत असतात. ग्रहांच्या गोचरमुळे एक किंवा एकापेक्षा जास्त ग्रह एका राशीत येतात. यावेळी ग्रहांचा संयोग होतो. असाच ‘त्रिग्रही योग’ तयार होणार आहे. ज्याचा मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर दिसून येणार आहे. ५० वर्षानंतर येत्या फेब्रुवारीमध्ये मकर राशीमध्ये शुक्रदेव, बुधदेव आणि मंगळदेव यांचा संयोग होणार आहे. तिन्ही ग्रह एकत्र आल्याने ‘त्रिग्रही योग’ तयार होत आहे. या त्रिग्रही योगाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. मात्र, यावेळी काही राशी अशा आहेत, ज्यांना मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. चला तर जाणून घेऊयात कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…
‘या’ राशींना होणार अपार धनलाभ?
मेष राशी
त्रिग्रही योग मेष राशींच्या लोकांसाठी फायदेशीर ठरु शकते. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो. तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकतं. त्रिग्रही योगातून आर्थिक लाभ होण्याची चांगली शक्यता आहे. नवीन नोकरीच्या ऑफर देखील येऊ शकतात. समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळण्याची शक्यता आहे. बरेच दिवस रखडलेले काम आता पूर्ण होऊ होऊ शकतात. नव्या मार्गातून पैशांची आवक वाढू शकते.
(हे ही वाचा : ११ फेब्रुवारीला शनिदेव होणार अस्त; ‘या’ राशींना ३८ दिवस लक्ष्मीची मिळू शकते साथ, धनलाभाने बँक बॅलन्समध्ये होईल वाढ?)
धनु राशी
धनु राशींच्या लोकांना त्रिग्रही योग बनल्याने काही चांगली बातमी मिळू शकते. थांबलेली कामे लवकरात लवकर पूर्ण होऊ शकतात. या काळात तुम्हाला परदेशी सहलीला जाण्याची संधी मिळू शकते. या काळात तुम्ही कोणत्याही परीक्षेत यश मिळवू शकता. व्यापार्यांना यावेळी चांगला नफा होऊ शकतो. त्याच वेळी, या काळात तुम्ही अनेक माध्यमांतून पैसे कमवू शकाल. यावेळी न्यायालयीन खटल्यांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे.
मकर राशी
त्रिग्रही योग मकर राशीतच तयार होत असल्याने या राशींच्या लोकांसाठी हा योग वरदानच ठरु शकते. कामाच्या ठिकाणी पगार आणि पद इत्यादींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुमच्या घरात पैशाची आवक वाढण्याची शक्यता आहे. या काळात अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. तुमच्या घरी वाहनाचे आगमन होऊ शकते. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहू शकते.
(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीच्या आधारे देण्यात आला आहे)