Budh-Rahu Yuti 2025: फेब्रुवारीमध्ये मोठ्या ग्रहांच्या राशी परिवर्तनासह काहींचे नक्षत्र परिवर्तनही होईल. ज्याचा शुभ प्रभाव १२ राशीपैकी काही राशींवर पाहायला मिळेल. अशातच ग्रहांचा राजकुमार बुध ग्रह या महिन्यामध्ये दोन वेळा राशी परिवर्तन करणार आहे. ज्याचा १२ राशींच्या व्यक्तीवर विविध परिणाम पाहायला मिळेल. २७ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजून ४६ मिनिटांनी बुधाने मीन राशीत प्रवेश केला असून बुधाचे गुरूच्या राशीतील हे राशी परिवर्तन अत्यंत फायदेशीर ठरेल. कारण, या राशीमध्ये राहू ग्रहदेखील विराजमान आहे. त्यामुळे या राशीत राहू आणि बुधाची युती निर्माण होईल. जी काहींना खूप फायदेशीर ठरेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या तीन राशींची होणार चांदी

तूळ

तूळ राशींच्या व्यक्तींसाठी बुध-राहूची युती खूप लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुमच्या भौतिक सुखात वाढ होईल. समाजात मान-सन्मान वाढेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. कुटुंबातही आनंदी आनंद असेल. त्याशिवाय तुम्ही त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लानदेखील कराल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीदेखील हा उत्तम काळ आहे. या काळात करिअरमध्ये यश मिळेल; तसेच प्रमोशनही मिळेल.

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या व्यक्तींनाही बुध-राहूची युती अत्यंत फायदेशीर ठरेल. या काळात तुमच्या आयुष्यातील सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. आयुष्यात आनंद निर्माण होईल.

कुंभ

कुंभ राशीसाठीही बुध-राहूची युती अनुकूल ठरेल. या काळात कुंभ राशीच्या व्यक्तींनाही प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. माणसिक तणावातून दूर राहाल. आयुष्यात आनंदी आनंद येईल. कामाच्या ठिकाणी दिले गेलेले लक्ष्य पूर्ण कराल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. या काळात तुम्हाला प्रत्येक कामात हवे तसे यश मिळेल. आयुष्यात मानसन्मान आणि कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल. व्यापारी वर्गाला प्रत्येक कामात यश मिळेल. आरोग्य चांगले राहील.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mercury rahus gochar 25 these three zodic sign will get success fame and happiness of wealth sap