Mesh To Meen Horoscope In Marathi, 16 June 2025 : १६ जून २०२५ रोजी जेष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथी आहे. पंचमी तिथी दुपारी ३ वाजून ४७ मिनिटांपर्यंत राहील, त्यानंतर चतुर्थी तिथी सुरु होईल. सकाळी ११ वाजून ०७ मिनिटांपर्यंत वैधृति योग जुळून येईल. रात्री १ पर्यंत १४ मिनिटांपर्यंत धनिष्ठा नक्षत्र जागृत असेल. राहू काळ ७:३० वाजता सुरु होईल ते ९ वाजेपर्यंत असणार आहे. तुमच्या राशीची आठवड्याची सुरुवात कशी होणार जाणून घेऊया…

या बातमीसह विशेष लेख आणि इतर दर्जेदार मजकूर मोफत वाचा

१६ जून २०२५ पंचांग व राशिभविष्य ( Daily Horoscope Of All Zodiac Sign, 16 June 2025)

दैनिक मेष आजचे राशिभविष्य (Dainik Aries Horoscope In Marathi)

कुटुंबाच्या बाबतीत सौख्य जाणवेल. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. मित्रांच्या गराड्यात राहण्याची इच्छा होईल. वरिष्ठांकडून सहकार्‍याची फार अपेक्षा ठेऊ नये. आपला ठसा उमटवण्याची संधी मिळेल.

दैनिक वृषभ आजचे राशिभविष्य (Dainik Taurus Horoscope In Marathi)

व्यवहारी दृष्टीकोनातून विचार कराल. कौटुंबिक गैरसमज टाळावेत. मानसिक चांचल्य जाणवेल. व्यवसायातून चांगली कमाई होईल. वसुलीत आनिश्चितता जाणवेल.

दैनिक मिथुन आजचे राशिभविष्य (Dainik Gemini Horoscope In Marathi)

बौद्धिक कामात सावध राहावे. मोहाला बळी पडू नका. निर्णयात इतरांवर विसंबून राहू नका. व्यावसायिक आघाडीवर सतर्क रहा. वरिष्ठांच्या सहकार्यावर अवलंबून राहू नका.

दैनिक कर्क आजचे राशिभविष्य (Dainik Cancer Horoscope In Marathi)

कार्यकालीन स्थितीवर लक्ष द्यावे. भावनाविवश होऊन विचार करू नका. मोठ्या वस्तूंची खरेदी कराल. थोडे अधिक श्रम घ्यावे लागू शकतात. दिवस कामात व्यतीत होईल.

दैनिक सिंह आजचे राशिभविष्य (Dainik Leo Horoscope In Marathi)

घेतलेल्या कष्टाचे चीज होईल. अधिकार्‍यांना नाराज करू नका. जोडीदाराचा राग समजून घ्यावा लागेल. भागीदाराशी मतभेदाची शक्यता. कामाशिवाय इतर गोष्टी टाळाव्यात.

दैनिक कन्या आजचे राशिभविष्य (Dainik Virgo Horoscope In Marathi)

दृष्टीकोन बदलून पहावा लागेल. हातातील संधी जाऊ देऊ नका. अपचनाचा त्रास जाणवेल. माहितीच्या आधाराने कामात यश येईल. संपर्कात वाढ होऊ शकेल.

दैनिक तूळ आजचे राशिभविष्य (Dainik Libra Horoscope In Marathi)

जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. प्रेम प्रसंगात सावधानता बाळगा. आपल्यातील स्वाभाविक दोष टाळता आले तर पहावे. वरिष्ठांच्या सूचनेचे तंतोतंत पालन करावे. अचानक धनलाभाची शक्यता.

दैनिक वृश्चिक आजचे राशिभविष्य (Dainik Scorpio Horoscope In Marathi)

व्यावसायिक कामातून मानसिक शांतता लाभेल. व्यक्तिगत छंद जोपासावेत. क्रोधाची भावना उचंबळू देऊ नका. क्षुल्लक चुका टाळण्याचा प्रयत्न करावा. अतिरिक्त खर्च टाळावा.

दैनिक धनू आजचे राशिभविष्य (Dainik Sagittarius Horoscope In Marathi)

आवक मर्यादित राहील. आर्थिक देवाणघेवाण करतांना सावध रहा. कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील. अधिकाराचा योग्य ठिकाणी वापर करावा. रेस, जुगार यातून लाभ संभवतो.

दैनिक मकर आजचे राशिभविष्य (Dainik Capricorn Horoscope In Marathi)

कामाचा जोम अधिक वाढेल. कुटुंबात तुमचा दरारा राहील. विचारांच्या गतीला आवर घालावी लागेल. सढळ हस्ते खर्च केला जाईल. परिस्थितीचा योग्य अंदाज बांधावा.

दैनिक कुंभ आजचे राशिभविष्य (Dainik Aquarius Horoscope In Marathi)

भावंडांकडून चांगली बातमी मिळेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करता येईल. व्यवसायात नवीन योजना आखाव्यात. कुटुंबियांशी वाद घालू नका. बोलण्यावर संयम ठेवावा लागेल.

दैनिक मीन आजचे राशिभविष्य (Dainik Pisces Horoscope In Marathi)

अचानक नवीन खर्च समोर येऊ शकतात. जोडीदाराच्या तब्येतीकडे विशेष लक्ष द्यावे. कौटुंबिक कामासाठी अधिक वेळ द्याल. सामाजिक गोष्टींचे भान राखून वागाल. आध्यात्मिक कामातून मनाला शांतता लाभेल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Monday 16 june 2025 daily horoscope ajche rashi bhavishya panchang today vnk 50 asp