Navratri Mahagauri Pooja and Chandra Gochar 2025: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक त्याच्या ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो ज्याचा शुभ-अशुभ प्रभाव मानवी जीवनावर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र एकमेव असा ग्रह आहे जो सर्वात वेगवान गतीने एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. तो एका राशीमध्ये जवळपास अडीच दिवस राहतो. त्यामुळे बऱ्याचदा काही राशींमध्ये चंद्राची दुसऱ्या ग्रहाबरोबर युती निर्माण होते. या युतीचा काही राशींच्या व्यक्तींवर शुभ तर काही राशींवर अशुभ परिणाम पाहायला मिळतो.
दरम्यान, सध्या शारदीय नवरात्री सुरू असून आज नवरात्रीचा आठवा दिवस आहे, आजच्या दिवशी देवी महागौरीची पूजा-आराधना केली जाते. शिवाय आज चंद्र वृश्चिक राशीतून धनु राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे चंद्राच्या राशी परिवर्तनासह देवी महागौरीची कोणत्या राशीवर विशेष कृपा राहील हे आपण जाणून घेऊ
‘या’ तीन राशींवर असणार चंद्रासह महागौरीची कृपा
कर्क (Kark Rashi)
कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस अत्यंत अनुकूल सिद्ध होणार आहे. चंद्र हा कर्क राशीचा स्वामी असल्याने चंद्राचे गोचर तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. शिवाय आजच्या दिवशी देवी महागौरीची देखील तुमच्यावर विशेष कृपा राहील. तुमच्या मनातील सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. आर्थिक स्थिती उत्तम राहील. मानसिक तणावापासून दूर राहाल. प्रत्येक क्षेत्रात पदोपदी यश मिळवाल.
धनु (Dhanu Rashi)
धनु राशीच्या व्यक्तींसाठी हे गोचर अत्यंत सकारात्मक ठरेल. चंद्र आज धनु राशीतच प्रवेश करणार असल्याने हे गोचर तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान-सन्मान वाढेल. या काळात भाग्याची साथ मिळेल. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल, आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे.
तूळ (Tula Rashi)
नवरात्रीचा आठवा दिवस आणि चंद्राचे गोचर तूळ राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत लाभदायी ठरणार आहे. या काळात तुमच्या आयुष्यात अनेक सकारात्मक बदल घडतील. समाजात मान-सन्मान वाढेल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. जोडीदाराला वेळ द्याल. या काळात तुम्हाला अचानक धनलाभ होईल आणि अडकलेले पैसे परत मिळतील. नोकरीत पदोन्नती होऊ शकते.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)