नवरात्री २०२४

नवरात्र, नवरात्री किंवा नवरात्रोत्सव हा (Navratri 2023) भारतासह जगभरामध्ये साजरा केला जातो. हिंदू शास्त्राप्रमाणे दर वर्षी ‘शारदीय नवरात्री’, ‘चैत्र नवरात्री’, ‘माघ गुप्त नवरात्री’ आणि ‘आषाढ गुप्त नवरात्री’ असे चार उत्सव पाहायला मिळतात. असे असले तरी बऱ्याच ठिकाणी प्रामुख्याने शारदीय नवरात्रोत्सव आणि चैत्र नवरात्रोत्सव साजरा होत असल्याचे पाहायला मिळते. शारदीय नवरात्रोत्सव हा शरद ऋतूमधील आश्विन या महिन्यामध्ये (सप्टेंबर-ऑक्टोबर) असतो. शरद ऋतूमुळे याला “शारदीय नवरात्रोत्सव” (Shardiya Navratri )असे म्हटले जाते. तर चैत्र या हिंदू कॅलेंडरमधील पहिल्या महिन्यामध्ये जो नवरात्रोत्सव असतो त्याला “चैत्र नवरात्रोत्सव” असे म्हणण्याची आपल्याकडे पद्धत आहे. हा उत्सव मार्च किंवा एप्रिल महिन्यामध्ये असतो.


नवरात्रोत्सव (Navratriutsav) या शब्दाची फोड केल्यास त्याचा अर्थ ‘नऊ रात्रींचा उत्सव’ असा होतो. पौराणिक कथांनुसार, महिषासुर नावाचा एक राक्षस मानवांसह देवांनाही त्रास देत होता. त्याने ब्रह्मदेवाची साधना करुन एक वरदान प्राप्त केले होते. या वरदानाच्या बळावर महिषासुरने सर्वत्र हाहाकार माजवला होता. तेव्हा महिषासुरला रोखण्यासाठी देवांनी एकत्र येत आदिशक्तीचे आवाहन केले. आदिशक्तीने दुर्गा हे रुप घेतले. पुढे दुर्गादेवीने महिषासुरच्या विरोधात युद्ध पुकारले. नवरात्रोत्सवच्या नऊ दिवसांमध्ये हे युद्ध सुरु होते असे म्हटले जाते. युद्धाच्या दहाव्या दिवशी म्हणजेच दसऱ्याला दुर्गा देवीने महिषासुरचा वध केला. अंधकारावरचा हा तेजस्वी विजय साजरा करण्यासाठी आपल्याकडे दसरा साजरा केला जातो. या सणाद्वारे विश्वातील स्त्री तत्वाचे महत्त्वदेखील अधोरेखित केले जाते.


नवरात्रोत्सव हा भारतात प्रांतवार पद्धतीने बदलत जातो. महाराष्ट्र, गुजरात व अन्य काही भागांमध्ये नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजे आश्विन प्रतिपदेच्या दिवशी घट बसवले जातात. यामुळेच या दिवसाला घटस्थापना असे नाव पडले. पश्चिम बंगाल तसेच त्याच्या आसपासच्या प्रदेशामध्ये दुर्गा देवीच्या मोठमोठ्या मूर्ती पाहायला मिळतात. प्रत्येक प्रदेशामध्ये आपापल्या पद्धतीने हा सण मोठ्या जल्लोषात साजरा होत असतो. गुजरात आणि पश्चिम बंगाल या ठिकाणी नवरात्रोत्सवाची मोठी धुम असते. मुंबई-महाराष्ट्रामध्ये ज्याप्रमाणे सार्वजनिक गणेशोत्सव असतो, अगदी त्याच प्रमाणात प.बंगाल त्यातही कोलकातामध्ये नवरात्रीचा जल्लोष असतो. तसेच नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये गुजरातमध्ये दांडिया-गरबा (Garba- Dandiya) खेळत आनंद लुटत असतात.


Read More
manachya kathya, solapur manachya kathya, manachya kathya tuljabhavani
सोलापूरच्या मानाच्या काठ्यांचे तुळजापूरनगरीत स्वागत

प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही अश्विन पौर्णिमेला सोलापूरनगरीच्या मानाच्या काठ्या घाटशीळ मार्गे तळजापूरनगरीत जगदंबेचा जयघोष करीत दाखल झाल्या.

A donation box kept at a Navratri festival in Mumbai Koparkhairane area was broken and stolen navi Mumbai
नवी मुंबई : नवरात्र उत्सवात ठेवण्यात आलेली दानपेटी फोडली, चोर सीसीटीव्हीत कैद; पण…

नवी मुंबईतील कोपरखैरणे भागात असणाऱ्या एका नवरात्र उत्सवात ठेवण्यात आलेली दानपेटी फोडून आतील पैशांची चोरी केल्याची घटना समोर आली आहे.

tulja bhavani temple dharashiv, donation, donation of rupees 3 crore 73 lakhs, navratri festival
नवरात्र कालावधीत तुळजाभवानीच्या तिजोरीत पावणे चार कोटी; पाऊण किलो सोने, बारा किलो चांदीही देवीचरणी अर्पण

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या तिजोरीत नवरात्र महोत्सवाच्या कालावधीत तब्बल पावणे चार कोटी रूपयांची देणगी जमा झाली आहे.

uran chit fund scam, navratri festival, fancy dress competition, uran chit fund fraud
उरण चिटफंड घोटाळ्याचं वेशभूषा प्रतिबिंब; नवरात्रात मुलांनी सादर केली प्रतिकात्मक कला

उरणच्या चिटफंड घोटाळ्याचे प्रतिबिंब मुलांनी सादर केल्याने पुन्हा एकदा या घोटाळ्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

deaths in garba
धक्कादायक! गरबा कार्यक्रमात लेकीची छेड काढणाऱ्या दोघांशी झालेल्या वादात वडिलांचा मृत्यू

गरबा कार्यक्रमात मुलीची छेड काढणाऱ्या तरुणांशी झालेल्या वादात वडिलांचा मृत्यू झाला आहे.

pimpri chinchwad garba, 2 young boys, koyta gang, beaten with koyta
पिंपरीत दांडियातील वादातून टोळक्याची दोघांना कोयत्याने मारहाण

आरोपींनी ‘तू आमच्या मध्ये काय येतोस, तुला ठार मारतो’ असे म्हणत त्याच्या डोक्यात कोयत्याने वार केले.

Raamleela
नवरात्रीमध्ये उत्तर भारतात सादर होणारी रामलीला कॅरेबियन बेटांवर कशी पोहोचली ? प्रीमियम स्टोरी

उत्तर भारतामध्ये नवरात्रीच्या काळात रामलीला सादर करण्यात येते. संगीत, संवाद, नृत्य यांच्या माध्यमातून रामकथा सांगितली जाते. रामलीला ही खरेतर लोकपरंपरा…

woman attacked with sickle pune
पुणे : नवरात्रोत्सवातील कार्यक्रमात महिलेसह दोघांवर कोयत्याने वार, तीन तरुणांना अटक

नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात टोळक्याने दहशत माजवून महिलेसह दोघांवर कोयत्याने वार केल्याची घटना जनता वसाहतीत घडली.

Today Horoscope in marathi
Daily Rashi Bhavishya: विजयादशमीनिमित्त ‘या’ राशीच्या व्यक्तींची मनातील इच्छा पूर्ण होणार, पाहा तुमचे भविष्य प्रीमियम स्टोरी

Horoscope Today in Marathi : राशीभविष्यानुसार कुंभ राशीच्या व्यक्तींनी फसवणुकीपासून सावध राहावे.

avoid traffic congestion Devi Visarjan, entry heavy vehicles banned Tuesday Wednesday navi mumbai
नवी मुंबईत मंगळवारी ठराविक काळात अवजड वाहनांना प्रवेश बंदी

देवी विसर्जन दरम्यान होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मंगळवारी सकाळी सात ते बुधवारी सकाळी सात पर्यंत जड अवजड वाहनांना प्रवेश बंदी…

Dharmaveer 2 Prasad Oak In The Look Of Anand Dighe At Tembhinaka Navratri 2023 video viral
तोच रुबाब तोच दरारा! बाळासाहेबांचा ढाण्या वाघ; साक्षात आनंद दिघे टेंभीनाक्यावर येतात तेव्हा, VIDEO व्हायरल

Viral video: देवीच्या दर्शनासाठी अचानक आनंद दिघे आले अन्..

संबंधित बातम्या