Lucky Girl Mulank: प्रत्येक तारखेला जन्मलेल्या व्यक्तींची त्यांची अशी खासियत असते. मात्र सारखी जन्मतारीख असलेल्या मूलांकाच्या व्यक्तींमध्ये काही गोष्टी सारख्या असतात. यामागे मूलांकाच्या त्या त्या संबंधित ग्रहांच्या स्वामींचा प्रभाव असतो. अशाच काही मूलांकाच्या मुलींबाबत जाणून घेऊ, ज्या स्वत:सोबत आपल्या पतीचंही भाग्य उजळवतात. हे मूलांक असलेल्या मुलींशी ज्यांचं लग्न होतं ते खूपच नशीबवान असतात.

या मुली त्यांच्या पतीवर प्रेम तर करतातच, मात्र प्रत्येक आव्हानाला धीराने तोंड देतात. त्या खूप टॅलेंटेड असतात आणि कुटुंबात धन-समृद्धी, सम्मान वाढवण्यासाठी काम करतात.

मूलांक १

ज्या लोकांचा जन्म कुठल्याही महिन्यातील १, १०, १९ किंवा २८ या तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक १ असतो. या मूलांकाचा स्वामी सूर्य देव असतो. १ मूलांक असलेल्या मुली खूप आत्मविश्वासू, ऊर्जा असलेल्या आणि महत्त्वाकांक्षी असतात. त्या त्यांचं करिअरही यशस्वीरित्या घडवतात. तसंच ज्या क्षेत्रात जातात तिथे खूप प्रगती करतात. सोबतच त्या त्यांच्या पतीलाही पुढे प्रगती करण्यासाठी प्रेरित करतात आणि पावलोपावली त्यांची साथ देतात.

मूलांक ४

ज्या मुलांची जन्मतारीख ४, १३ आणि २२ असते, त्यांचा मूलांक ४ असतो. त्यांचा स्वामी राहु आहे. ४ मूलांक असलेल्या मुली खूप प्रॅक्टिकल असतात. सोबतच त्यांची बुद्धईही तल्लख असते. त्या त्यांच्या पतीच्या आयुष्यात आर्थिक स्थिरता आणि प्रगती घेऊन येतात. तसंच वाईट काळात कुठल्याही समस्येवर मार्ग काढतात.

मूलांक ६

ज्या मुलींचा जन्म कोणत्याही महिन्यात ६, १५ किंवा २४ तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक ६ असतो. मूलांक ६चा स्वामी शुक्र ग्रह असतो आणि त्यांच्यावर देवी लक्ष्मीची विशेष कृपा असते. या मुली आकर्षक, मेहनती, बुद्धिमान आणि भाग्यशाली असतात. ज्या घरात जातात, तिथे पैसाच पैसा येतो. सोबतच पतीला खूप प्रेमाने जपतात. या मुली खूप रोमँटिकही असतात.

मूलांक ९

ज्या मुलींची जन्मतारीख ९, १८ आणि २८ असतो, त्यांचा मूलांक ९ असतो. मूलांक ९चा स्वामी मंगळ असतो. मंगळ ग्रहाच्या प्रभावामुळे या मुली साहसी, निडर आणि दृझनिश्चयी असतात. कुटुंबावर काही संकट आलं तर त्या एकट्या आधार होतात. त्यांच्यात संघर्षालाही विजयात बदलण्याची क्षमता असते. या खूप चांगल्या लाइफ पार्टनर ठरतात.