Numerology Secrets: ज्‍योतिष शास्‍त्राप्रमाणे अंकशास्त्राला सुद्धा अनन्यसाधारण महत्त्व आहे. व्यक्ती त्याच्या जन्मतारखेवरून भविष्याविषयी जाणून घेऊ शकतो. मूलांक यासाठी खूप महत्त्वाचा घटक असतो. ज्योतिष शास्त्रामध्ये १२ राशींच्या आधारे व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाविषयी सांगितले जाते तसेच अंकशास्त्रामध्ये मूलांक १ ते ९ पर्यंत व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाविषयी जाणून घेता येते. आज आपण अशा मूलांकविषयी जाणून घेणार आहोत, जे लोक धन संपत्तीबरोबर पैसे सुद्धा कमवतात आणि तेवढाच आदर सन्मान सुद्धा कमवतात. (numerology people born on these dates earn immense money and wealth with huge respect in life)

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘या’ तारखेला जन्मलेले लोक पैशांबरोबर कमावतात भरपूर मान सन्मान

अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या ६, १५ आणि २४ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ६ असतो. मूलांक ६ चा स्वामी शुक्र देव असतो. हा शुक्र ग्रह धन वैभवाचा कारक मानला जातो.शुक्र ग्रहाच्या कृपेने आयुष्यात धन संपत्ती मिळते आणि हे लोक श्रीमंत होतात आणि राजाप्रमाणे आयुष्य जगतात.

आकर्षक असतात हे लोक

या लोकांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये एक आगळे वेगळ आकर्षण असते ज्याच्या कारणाने लोक त्यांच्याकडे आकर्षित होतात. यांना लोक खूप पसंत करतात. त्यांचे बोलणे, त्यांच्या बोलण्याचा अंदाज लोकांना आवडतो. त्यामुळे हे लोक ज्या ठिकाणी जातात, तिथे सर्वांचे लक्ष वेधून घेतात.

इतरांना मदत करतात

मूलांक ६ असलेले लोक खूप चांगले आयुष्य जगतात. ते दुसऱ्यांची खूप मदत करतात. त्यामुळे त्यांना नेहमी आदर सन्मान मिळतो. तसेच हे लोक स्वभावाने खूप प्रेमळ असतात. ते कधीही इतरांना मदत करण्यास तसेच अडचणीच्या वेळी धावून जातात.

रोमँटिक असतात हे लोक

या लोकांना महागड्या वस्तू आणि लक्झरी गोष्टींची खूप आवड असते. तसेच हे लोक खूप पैसा खर्च करतात. हे लोक सौंदर्याकडे खूप लवकर आकर्षिक होतात. हे लोक त्यांच्या जोडीदारावर खूप प्रेम करता त. हे लोक रोमँटिक सुद्धा असतात. या लोकांना चांगला लाइफ पार्टनर मिळतो. त्यांचा जोडीदारावर भरपूर विश्वास असतो.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Numerology people born on these dates earn immense money and wealth with huge respect in life ndj