यंदा ऑक्टोबर महिन्याची सुरुवात अतिशय पवित्र होत आहे. या महिन्याची सुरुवात नवरात्री, दुर्गा पूजा आणि दसऱ्याच्या होत आहे. म्हणूनच हा महिना सर्व राशींसाठी अतिशय खास ठरणार आहे. तसेच या महिन्यात सूर्य, शुक्र यांच्यासह अनेक ग्रह संक्रमण करणार असल्याने प्रत्येक राशीवर याचा चांगला किंवा वाईट प्रभावही पडेल. येणारा महिना सर्व राशींसाठी कसा ठरणार आहे ते जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
  • मेष

पुढील महिन्यात या राशीच्या लोकांना सावध राहण्याची गरज आहे. या काळात त्यांना आर्थिक नुकसान होण्याची संभावना आहे. तसेच सततच्या चिंतेमुळे तुम्ही जीवनाचा आनंद घेण्यापासून वंचित राहू शकता. तथापि, कालांतराने परिस्थितीत सुधार होऊ शकतो. त्यामुळे शांत आणि संयमी राहण्याचा प्रयत्न करा.

  • वृषभ

या महिन्यात तुम्ही सकारात्मक आणि नकारात्मक अशा मिश्र परिणामांना सामोरे जाल. त्यामुळेच कोणतीही गोष्ट नीट विचारपूर्वक हाताळा. या महिन्यात तुमचा मासिक खर्च वाढण्याची शक्यता असल्याने हुशारीने खर्च करा.

  • मिथुन

या महिन्यातील काही दिवस तुम्हाला आर्थिक समस्या आणि खर्चातील वाढीची काळजी सतावू शकते. त्यामुळे विचारपूर्वक पैसे गुंतवा. मात्र, काही दिवसात परिस्थिती सामान्य होईल.

२४ नोव्हेंबरपर्यंत ‘या’ चार राशींना राहावं लागेल सावध; गुरूच्या वक्री अवस्थेमुळे कौटुंबिक कलह निर्माण होण्याची शक्यता

  • कर्क

येणार महिना तुमच्यासाठी शांती, प्रेम आणि आनंद घेऊन येईल अशी आशा आहे. मात्र प्रवास करताना सावधगिरी बाळगावी. तसेच, कुटुंबियांच्या स्वास्थ्याची काळजी घ्या. यामुळे तुम्हाला त्रास होण्याची संभावना आहे.

  • सिंह

या महिन्यात तुम्हाला चिंता आणि नैराश्याला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे जास्तीत जास्त वेळ कुटुंबियांसह घालवण्याचा प्रयत्न करा. तसेच, प्रवासादरम्यान विशेष काळजी घ्या, अपघातास सामोरे जाण्याची शक्यता आहे.

  • कन्या

ऑक्टोबर महिन्यात तुम्हाला शांती, आनंद आणि समाधान मिळेल. तुम्ही नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही योग्य वेळ असेल.

  • तूळ

या महिन्यात तुम्हाला आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागू शकते. तसेच, अपघाताची शक्यता असल्याने नियमित प्रवास करताना सावधगिरी बाळगा.

२६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबरचा काळ ‘या’ राशींसाठी अतिशय नाजूक; वेळीच सावध व्हा, अन्यथा मोठी समस्या उद्भवेल

  • वृश्चिक

ऑक्टोबर महिन्यात तुमचे आरोग्य आणि संपत्ती दोन्ही गुष्टि सुधारू शकतात. या महिन्यात तुम्ही ज्या क्षेत्रात गुंतवणूक करणार असाल त्यात तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे. तथापि, या महिन्यात तुमचे खर्च थोडे वाढू शकतात.

  • धनु

या महिन्यात तुम्हाला चांगले परिणाम मिळू शकतात. तुम्हाला प्रमोशनही मिळू शकते. म्हणून, तुमच्या कामाच्या ठिकाणी नवीन कल्पना आणि धोरणे प्रत्यक्षात उतरवण्यास अजिबात संकोच करू नका.

  • मकर

तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल, तर ही योग्य वेळ असू शकते. तथापि, या महिन्यात खर्च वाढू शकतात.

ऑक्टोबर महिन्यात एक नाही तर तब्बल पाच वेळा होणार ‘या’ ग्रहांचे राशी परिवर्तन; कसा असेल यांचा प्रभाव? जाणून घ्या

  • कुंभ

या महिन्यात तुम्हाला कौटुंबिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे परिस्थिती काळजीपूर्वक हाताळा. आजारपणामुळे रुग्णालयात दाखल व्हावे लागू शकते. तसेच या काळात तुमची आर्थिक वृद्धी होण्याचेही संकेत आहेत.

  • मीन

या महिन्यात खर्च वाढल्याने तुम्हाला चिंता वाटू शकते. तुमच्या भूतकाळात केलेल्या गुंतवणुकीमुळे तुम्हाला लाभ होऊ शकतो. पोटाच्या समस्यांसारख्या किरकोळ आरोग्याच्या समस्या संभवतात. म्हणून, स्वतःची योग्य काळजी घ्या.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: October month horoscope monthly zodiac signs 2022 pvp