scorecardresearch

२६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबरचा काळ ‘या’ राशींसाठी अतिशय नाजूक; वेळीच सावध व्हा, अन्यथा मोठी समस्या उद्भवेल

बुध २६ ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारी १ वाजून ३८ मिनिटांनी कन्या राशीतून बाहेर पडेल आणि तूळ राशीत प्रवेश करेल आणि १३ नोव्हेंबर २०२२ पर्यंत या स्थितीत राहील.

२६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबरचा काळ ‘या’ राशींसाठी अतिशय नाजूक; वेळीच सावध व्हा, अन्यथा मोठी समस्या उद्भवेल
हिंदू धार्मिक मान्यतेनुसार, याचा अनेक राशींवर अनुकूल प्रभाव आणि अनेकांवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. (File Photo)

ज्योतिष शास्त्रानुसार २६ ऑक्टोबर २०२२ ते १३ नोव्हेंबर २०२२ हा काळ अनेक राशींसाठी खूप प्रतिकूल असू शकतो. याचे कारण म्हणजे बुध ग्रह तूळ राशीत प्रवेश करत आहे. बुध हा बुद्धीचा कारकदेखील मानला जातो. बुध २६ ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारी १ वाजून ३८ मिनिटांनी कन्या राशीतून बाहेर पडेल आणि तूळ राशीत प्रवेश करेल आणि १३ नोव्हेंबर २०२२ पर्यंत या स्थितीत राहील.

हिंदू धार्मिक मान्यतेनुसार, याचा अनेक राशींवर अनुकूल प्रभाव आणि अनेकांवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. आज आपण जाणून घेऊया कोणत्या राशीच्या लोकांवर याचा विपरीत परिणाम होऊ शकतो आणि या काळात कोणत्या राशीच्या लोकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.

मेष : या राशीच्या लोकांच्या तिसऱ्या घराचा स्वामी बुध आहे. या काळात या राशीच्या लोकांना प्रवासाला जावे लागू शकते. त्यामुळे आर्थिक खर्च वाढू शकतो. आरोग्याच्या समस्या असू शकतात. अशा परिस्थितीत आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

तूळ : या राशीच्या लोकांना या काळात एखाद्याच्या आजारपणामुळे आर्थिक खर्च सहन करावा लागू शकतो. पैशांची बचत करण्यात यश मिळणार नाही. तसेच, या काळात तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. यादरम्यान गुंतवणूक वगैरे काळजीपूर्वक करा, अन्यथा नुकसान होऊ शकते.

तब्बल ५९ वर्षांनी तयार होत आहेत पाच शक्तिशाली राजयोग; उघडणार ‘या’ पाच राशींच्या नशिबाचे दार

वृश्चिक : खर्च वाढल्यामुळे या राशीच्या लोकांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. या काळात पैशाशी संबंधित कोणत्याही प्रकारचे व्यवहार टाळावे लागतील. योजनेनुसार खर्च करा. असे न केल्यास पैशाची कमतरता भासू शकते आणि त्यामुळे तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तणावदेखील असू शकतो. कामाच्या ठिकाणी विरोधकांपासून सावध राहावे लागेल. या काळात विरोधक नुकसान करू शकतात.

कुंभ : या राशीच्या लोकांना या काळात त्यांच्या मेहनतीनुसार फळ मिळण्याची शक्यता कमी आहे. खर्चात वाढ झाल्यामुळे तुम्हाला तणावाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

कन्या : या राशीच्या लोकांना रस्ता अपघात इत्यादींना सामोरे जावे लागू शकते. अशा परिस्थितीत रस्त्यावरून चालताना आणि प्रवास करताना अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या