Hastrekha Shastra: परदेशात जाणे, नवीन ठिकाणी फिरणे हे बहुतेक लोकांचे स्वप्न असते. त्याचबरोबर काही लोक कायमस्वरूपी परदेशात स्थायिक व्हायलाही इच्छुक असतात, तर काही लोक आपला व्यवसाय अनेक देशांमध्ये पोहोचवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेतात. मात्र, परदेशाशी संबंधित या स्वप्नांची पूर्तता प्रत्येकाच्या नशिबात नसते. हस्तरेषाशास्त्राच्या मदतीने त्या व्यक्तीला परदेशात जाण्याची किंवा स्थायिक होण्याची संधी मिळते की नाही हे सहज कळू शकते.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
या रेषा परदेशात जाण्याचे स्वप्न पूर्ण करतात
तळहातातील बुध पर्वतावरून एखादी रेषा निघून अनामिकेच्या तळाशी गेली तर अशा व्यक्तीला आयुष्यात अनेक वेळा परदेशात जाण्याची संधी मिळते.
आणखी वाचा : Ketu Gochar: १२ एप्रिल रोजी छाया ग्रह केतुचे भ्रमण होईल, या ३ राशींच्या संपत्तीत वाढ होईल
- बुध पर्वतातून निघणारी ही रेषा चंद्र पर्वतावर गेली तरी त्या व्यक्तीला परदेशात जाण्याची संधी मिळते.
- जर एखादी रेषा कंकण सोडून मंगळाच्या पर्वतावर गेली तर अशा व्यक्तीला परदेशात जाण्याचीही संधी मिळते.
- चंद्र पर्वतावर स्वस्तिक चिन्ह असल्याने व्यक्ती परदेश प्रवास करू शकते.
- ज्या लोकांच्या हातात चंद्र पर्वतापासून गुरु पर्वतापर्यंत रेषा आहे, त्यांचे लग्न परदेशात होण्याची शक्यता जास्त असते.
- जर चंद्र पर्वतावरून निघणारी रेषा शनीच्या पर्वतावर गेली तर अशी व्यक्ती केवळ परदेशातच वारंवार प्रवास करत नाही तर परदेशातूनही भरपूर पैसा कमावतो.
- प्रवासाची रेषा जीवनरेषेपेक्षा जाड आणि खोल असेल तर असे लोक परदेशात स्थायिक होतात.
- चंद्र पर्वताजवळ त्रिभुज चिन्ह असल्यास अशा लोकांना जगभ्रमण करण्याची संधी मिळते.
First published on: 11-04-2022 at 17:30 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Palmistry these lines of hand tells people will go on world tour or settle in abroad prp