Rahu Nakshatra Transit 2024:  ठराविक वेळेनंतर प्रत्येक ग्रह राशी बदलत असतो. राहूला छाया ग्रह म्हणतात. ज्योतिषशास्त्रानुसार राहुला अशुभ ग्रह सुद्धा मानले जाते. जर हा ग्रह कोणत्याही राशीमध्ये अशुभ स्थितीत असेल तर त्याचे वाईट परिणाम दिसून येतात आणि जर शुभ स्थितीत असेल तर त्या व्यक्तीला आर्थिक लाभ, मान सन्मान प्रतिष्ठा, धनलाभ होण्याची शक्यता असते. राहू ३० ऑक्टोबर २०२३ पासून मीन राशीत आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार राहू १८ मे २०२५ पर्यंत याच राशीत असतील. परंतु तत्पुर्वी राहू काही दिवसांनी नक्षत्र परिवर्तन करणार आहेत. सध्या राहु रेवती नक्षत्रात आहे आणि आता राहू उत्तरा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. राहुचं हे नक्षत्र परिवर्तन ८ जुलै रोजी होणार आहे. त्यामुळे काही राशींना राहूच्या कृपेने सुखाचे दिवस पाहायला मिळू शकतात. जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘या’ राशींचे भाग्य चमकणार?

वृषभ राशी

राहुच्या नक्षत्र परिवर्तनाने वृषभ राशीच्या लोकांना सुख-समृद्धी मिळू शकते. या राशीच्या लोकांना नशिबाचीही पूर्ण साथ मिळू शकते. व्यवसायात मोठे यश आणि आर्थिक लाभ होऊ शकतो. व्यवसायात मोठा करार होऊ शकतो. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात. नोकरदार लोकांच्या कामाचे कौतुक होऊ शकते. तुम्हाला काही मोठी जबाबदारी मिळू शकते. वैवाहिक जीवनात सुरू असलेल्या समस्या संपुष्टात येऊ शकतात. तुमच्या जोडीदारासोबतचे तुमचं नातं सुधारू शकणार आहे.

(हे ही वाचा: वाईट काळ संपणार! ४७ दिवसांनी ‘या’ राशींचा सुरु होतोय सुवर्णकाळ? बुधदेवाची वक्री चाल तुम्हाला देऊ शकते अपार श्रीमंती )

तूळ राशी

राहुच्या नक्षत्र परिवर्तनाने तूळ राशीच्या लोकांचे नशिबाने साथ दिली तर बिघडलेले काम पूर्ण होऊ शकतात. तुमच्या आवडीच्या कोणत्याही ठिकाणी पोस्टिंग मिळवू शकता. जुन्या गुंतवणुकीतून यावेळी फायदा होऊ शकतो. तुमच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पडू शकतो. मन शांत राहणार आहे. या काळात तुमचं उत्पन्न वाढू शकते. तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळू शकते. समाजात मान-प्रतिष्ठेच्या मागणीत वाढ होऊ शकते. शेअर मार्केटमध्ये तुम्हाला आर्थिक लाभही मिळू शकतो. 

वृश्चिक राशी

राहुच्या नक्षत्र परिवर्तनाने वृश्चिक राशीच्या लोकांचे अच्छे दिन येऊ शकतात. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. व्यवसाय परदेशाशी संबंधित असेल तर तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळवू शकता. तुम्हाला मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. करिअर आणि बिझनेसमध्ये विशेष फायदा होऊ शकतो. मालमत्तेशी संबंधित काम करणाऱ्यांसाठी हा काळ उत्तम ठरू शकतो. ऑफिसमध्ये काही कामात तुम्हाला मोठी बढती मिळण्याची शक्यता आहे.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे) 

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahu nakshatra gochar 2024 rahu transit uttarabhadrapada nakshatra these zodiac sing can get huge money pdb