Rahu’s Nakshatra transformation 2025: ज्योतिषशास्त्रात राहू ग्रहाला मायावी ग्रह म्हटलं जातं. त्यामुळे राहूच्या राशी परिवर्तनाचा किंवा नक्षत्र परिवर्तनाचा प्रभाव प्रत्येक राशीच्या व्यक्तींना मिळतो. शनीनंतर राहू ग्रहाला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी अधिक काळ लागतो. राहू जवळपास १८ महिने एका राशीत राहतो. तसेच तो वक्री चाल चालतो. दरम्यान, २०२४ मध्ये राहू मीन राशीत विराजमान होता. आता २०२५ तो कुंभ राशीत राशी परिवर्तन करील. राहूच्या कुंभ राशीतील राशी परिवर्तनाने काही राशींच्या व्यक्तींना शुभ परिणाम पाहायला मिळेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंचांगानुसार, राहू १८ मे २०२५ संध्याकाळी ५ वाजून ८ मिनिटांनी शनीच्या कुंभ राशीत प्रवेश करणार असून तो ५ डिसेंबर २०२६ पर्यंत या राशीत राहिल.

राहूचे राशी परिवर्तन ‘या’ तीन राशींना करणार मालामाल

कुंभ

कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी राहूचे राशी परिवर्तन लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुमची अडकलेली कामे पूर्ण होतील. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. विद्यार्थ्यांसाठीदेखील हा उत्तम काळ आहे. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल आणि त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लानदेखील कराल. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. समाजात मान-सन्मान वाढेल. भाग्याची पुरेपुर साथ मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. तुमची आर्थिक चणचण दूर होईल.

मेष

मेष राशीच्या व्यक्तींसाठी राहूचे राशी परिवर्तन अत्यंत फायदेशीर ठरेल. या काळात तुम्हाला कुटुंबीयांची साथ मिळेल. या काळात तुमच्या आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल आणि गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. जोडीदाराकडून आनंदी वार्ता मिळेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल.

हेही वाचा: २०२५ ‘या’ पाच राशींसाठी ठरणार लकी; ग्रहांचे नक्षत्र परिवर्तन देणार भरपूर पैसा आणि भौतिक सुख

धनु

धनु राशीच्या व्यक्तींसाठी राहूचा कुंभ राशीतील प्रवेश खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. त्यांच्यासोबत दूरचे प्रवास घडतील. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल आणि त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लानदेखील कराल. आरोग्याची विशेष काळजी घ्या. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. प्रेमसंबंध सुखमय होतील.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahus nakshatra transformation 25 this three zodiac signs will give lots off money sap