Diwali 2025 Astrology Predictions: या वर्षीची दिवाळी (Diwali 2025) फक्त प्रकाश आणि आनंदाची नाही तर ग्रह-नक्षत्रांच्या दृष्टीनंही अत्यंत खास ठरणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, ७१ वर्षांनंतर या दिवाळीत एक अद्भुत आणि दुर्लभ संयोग बनत आहे, जो काही राशींसाठी अतिशय शुभ मानला जातो.

ग्रहांचा अनोखा मेळ

या वेळी देवगुरु बृहस्पति आपल्या उच्च कर्क राशीत विराजमान आहेत, तर तुळ राशीत सूर्य आणि बुध मिळून बुधादित्य योग तयार करत आहेत. त्याच राशीत सूर्य, मंगळ आणि बुधाचा त्रिग्रही योगही निर्माण होत आहे. याशिवाय, सर्वार्थ सिद्धी योग आणि महालक्ष्मी राजयोग यांचाही शक्तिशाली संयोग या दिवाळीत दिसून येतोय. अशा दुर्मीळ ग्रहस्थितीमुळे काही राशींवर धन, यश आणि समाधानाचा वर्षाव होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चला जाणून घेऊया, कोणत्या ५ राशींची या दिवाळीपासून भाग्य उजळण्याची शक्यता आहे…

ग्रह-नक्षत्रांचा अद्भुत संयोग! या राशींचं भाग्य उजळणार दिवाळीतच!

मेष

मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो. विचारपूर्वक घेतलेले निर्णय लाभदायी ठरू शकतात. नोकरीत प्रमोशन किंवा इन्क्रिमेंटची शक्यता दिसतेय. कुटुंबात एखादी आनंदवार्ता कळू शकते. आरोग्याच्या दृष्टीनेही कालावधी चांगला जाईल.

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांना भाग्याची साथ असल्याचं ज्योतिषशास्त्र सांगतं. धन आणि संपत्तीविषयक गोष्टींमध्ये फायदा होण्याची शक्यता आहे. नव्या गुंतवणुकीसाठी योग्य काळ म्हणता येईल. मित्र-नातलगांशी भेटीगाठी होतील. दीर्घकाळाची एखादी मनोकामना पूर्ण होण्याचा योग निर्माण होऊ शकतो.

कर्क

करिअरमध्ये नव्या संधींचं दार उघडण्याची शक्यता आहे. व्यवसायात विस्तार होईल. वाहन किंवा घर खरेदीचा योगही संभवतो. वडिलांकडून एखाद्या मोठ्या कामात मदत मिळू शकते. परिश्रमाचं फळ मिळण्याची चिन्हं आहेत.

कन्या

कन्या राशीतील लोकांसाठी महालक्ष्मीची विशेष कृपा असल्याचं ज्योतिष मत मांडतं. खर्चावर नियंत्रण राहील आणि उत्पन्नाच्या नव्या मार्गांचा शोध लागेल. क्रिएटिव्ह क्षेत्रात काम करणाऱ्यांना नाव आणि पैसा मिळण्याची शक्यता आहे. दाम्पत्य जीवनात गोडवा वाढेल.

मकर

मकर राशीच्या लोकांसाठी ही दिवाळी अनपेक्षित धनलाभाची दारं उघडू शकते. पूर्वीच्या गुंतवणुकीतून फायदा मिळू शकतो. घर, दुकान किंवा प्रॉपर्टी खरेदीचा विचार यशस्वी होऊ शकतो. आर्थिक क्षेत्रात सक्रियता वाढेल आणि काही जुन्या स्वप्नांची पूर्तता होण्याची शक्यता आहे.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. त्याच्या तथ्यांबद्दल लोकसत्ता कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोराही देत नाही.)