Tri Ekadash Yog 2025 Impact in Marathi: वैदिक ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला विशेष महत्त्व आहे. शनी हे कर्म व न्याय देवता म्हणून ओळखले जातात. प्रत्येक राशीच्या व्यक्तीला त्याच्या/तिच्या कर्मानुरूप फळ देणारे शनी हे कलियुगातील दंडाधिकारी आहेत. ज्योतिषीय गणनेनुसार, शनी सध्या मीन राशीत विराजमान असून जून २०२७ पर्यंत तिथेच राहणार आहेत. याच दरम्यान ६ जुलै रोजी देवशयनी एकादशीच्या दिवशी शनी आणि शुक्र एका विशेष ‘लाभ दृष्टि’ मध्ये येणार आहेत. यालाच ‘त्रिएकादश योग’ म्हटलं जातं. या दुर्मीळ संयोगाचा तीन राशींवर प्रचंड सकारात्मक परिणाम होणार आहे, असा संकेत मिळतोय. जाणून घ्या त्या भाग्यशाली राशी…

वृषभ (Taurus)

शुक्र लग्नस्थानी आणि शनी एकादश भावात विराजमान असल्यामुळे वृषभ राशीसाठी हा कालखंड अत्यंत शुभ ठरणार आहे. शिक्षणात येणारे अडथळे दूर होऊ शकतात, विशेषतः कला आणि साहित्य क्षेत्रातील विद्यार्थ्यांना मोठा फायदा होऊ शकतो. या काळात कामात आणि व्यवसायात विशेष प्रगती होऊ शकेल. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीत आता चांगला नफा मिळू शकतो. आर्थिक अडचणींवर मात करता येईल, घरात सुख-शांती नांदेल आणि नवीन मालमत्ता मिळण्याची शक्यता निर्माण होईल. व्यापारातही मोठा नफा होण्याची चिन्हं आहेत.

कर्क (Cancer)

या राशीसाठी त्रिएकादश योग जबरदस्त फायदेशीर ठरणार आहे. नोकरी आणि व्यवसायातील अडथळे दूर होऊ शकतात. कोर्ट-कचेरीचे प्रश्न आपल्या बाजूने सुटू शकतात. कुटुंबासोबत वेळ घालवता येईल. विशेष म्हणजे अडकलेला पैसा परत मिळण्याची शक्यता आहे. तसेच, करिअरचे नवे पर्याय तुमच्यासमोर खुले होऊ शकतात. नोकरी-व्यवसायात तुम्हाला चांगला लाभ मिळू शकतो. भौतिक सुखे मिळू शकतात. नवीन आर्थिक संधी प्राप्त होऊ शकतात आणि गुंतवणुकीतून चांगला नफा मिळू शकतो. जीवनात आनंद आणि शांतता लाभू शकेल.

तूळ (Libra)

शनी सहाव्या आणि शुक्र आठव्या भावात असल्याने तूळ राशीच्या लोकांना अपार यश लाभू शकते. नशीब प्रबळ असेल, मेहनतीचे योग्य फळ मिळेल, आणि शत्रूंवर विजय मिळवता येईल. उत्पन्नाचे अनेक स्रोत उघडू शकतात. तुमच्या सुख-संपत्तीत चांगली वाढ झालेली दिसेल. तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात. तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळू शकेल. व्यवसायात मोठा नफा मिळू शकतो. शारीरिक थकवा कमी होईल, नवीन संधी लाभतील आणि कामाच्या ठिकाणी नाव होईल. आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकेल. दीर्घकालीन आजार दूर होऊ शकतात.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)