Guru Gochar Gajlakshmi Rajyoga: देवगुरु बृहस्पतीने तब्बल १२ वर्षांनी मेष राशीत प्रवेश घेतला आहे. मेष ही मंगळाची रास आहे. यापूर्वी १४ एप्रिलला मेष राशीत सूर्याने प्रवेश घेतला होता. गुरु व सूर्याची युती तसेच मंगळाचा मूळ राशीतील प्रभाव यामुळे १२ वर्षांनी पहिल्यांदाच या ग्रहांमुळे गजलक्ष्मी राजयोग तयार होत आहे. याचा शुभ-अशुभ प्रभाव सर्वच राशींवर दिसून येणार आहे पण ५ अशा राशी आहेत ज्यांना गुरु- सूर्य भाग्योदयाचा अनुभव देऊ शकतील. ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार, ही युती १५ मे पर्यंत कायम असणार आहे. त्यामुळे येत्या काळात नेमक्या कोणत्या राशींना कशाप्रकारे लाभ होऊ शकतो हे पाहूया..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गजलक्ष्मी राजयोग बनल्याने ‘या’ राशी होतील श्रीमंत?

मेष रास (Mesh Rashi)

मेष राशीसाठी सूर्य व गुरु युतीचा गजलक्ष्मी राजयोग अत्यंत लाभदायक सिद्ध होऊ शकतो. मेष राशीला येत्या काळात प्रचंड धनलाभ होऊ शकतो.मान – सन्मान वाढल्याने धनलाभ होण्याची चिन्हे दिसत आहेत. तुम्हाला येत्या काळात मेहनतीचे मोठे फळ लाभू शकते.

मिथुन रास (Mithun Rashi)

मिथुन राशीला करिअरमध्ये मोठ्या प्रगतीची चिन्हे आहेत. तुम्हाला पदोन्नती व पगारवाढ मिळू शकते. काही महत्त्वाची कामे हातातून जाऊ देऊ नका. स्थावर जमिनीचे व्यवहार करताना कागदपत्रे तपासून घ्यावीत. घरातील काही महत्त्वाचे निर्णय घाईने घेऊ नका

कर्क रास (Karka Rashi)

कर्क राशीला येत्या काळात नव्या व्यवसायाचा भाग होता येईल यासाठी तुम्हाला अत्यंत लाभदायक स्थिती तयार होत आहे. वैवाहिक जीवनात आनंद येऊ शकतो. मीन राशीतील नेपच्यून गुरूला आपल्या सत्कर्माची योग्य जाणीव करून देईल.

सिंह राशी (Sinha Rashi)

राहू-गुरूचे निर्माण होणारे पडसाद केतू आपल्या पराक्रमाने दूर करील. गुरू-हर्षलचा प्रगतिशील प्रवास सुरू होईल. तुम्हाला वाडवडिलांच्या संपत्तीचा पुरेपूर लाभ होऊ शकतो.

हे ही वाचा<< “२०२४ मे नंतर निवडणूक झाली तर भाजपाला फक्त… ” ज्योतिषतज्ज्ञांनी कुंडलीवरून केली मोठी भविष्यवाणी

मीन रास (Meen Rashi)

मीन राशीला गुरु व सूर्याची युती समाजात यश मिळवून देऊ शकते. तुम्हाला प्रगतीचे योग आहेत पण त्यासाठी आळस पूर्णपणे काढून टाकावा लागेल. कामात जोडीदाराच्या मदतीने यश मिळवू शकाल. तुम्हाला शेअर बाजारात गुंतवणुकीतून प्रचंड पैसे कमावता येऊ शकतात

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rarerst guru gochar makes gajlakshmi rajyog these zodiac signe will get huge money lakhs of rupees earning astrology news svs