Saturn Horoscope: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. ज्योतिषशास्त्रात शनिला महत्त्वाचं स्थान आहे. शनि अत्यंत धीम्या गतीने आपली चाल बदलतो. सर्व ग्रहांमध्ये शनि हा सर्वात मंद गतीने जाणारा ग्रह आहे, एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी त्याला सुमारे अडीच वर्षे लागतात. ज्योतिषशास्त्रात शनीच्या नक्षत्रात होणारा बदल खूप महत्त्वाचा मानला जातो. शनिदेव सध्या पूर्वा भाद्रपद नक्षत्राच्या द्वितीय स्थानात विराजमान आहेत. १८ ऑगस्ट रोजी प्रतिगामी वाटचाल करताना, शनि पूर्वा भाद्रपद नक्षत्राच्या प्रथम स्थानात प्रवेश करतील. ज्याचा स्वामी गुरू आहे. त्यानंतर शनीचा पुढील नक्षत्र बदल ऑक्टोबर महिन्यात शतभिषा नक्षत्राच्या चतुर्थ स्थानात होईल. अशा स्थितीत शनिदेवाच्या बदलाचा सर्व राशींवर नक्कीच काही ना काही प्रभाव पडणार आहे. बृहस्पतिच्या नक्षत्रात शनीच्या हालचालीतील बदलामुळे कोणत्या राशींचे भाग्य सोन्यासारखे चमकणार, हे जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कन्या राशी

शनी देवाच्या कृपेने कन्या राशीच्या लोकांना शुभ परिणाम मिळू शकतात. जुन्या गुंतवणुकीतूनही नफा मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुमची आर्थिक बाजू मजबूत होऊ शकते. तुमची प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. या काळात उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. या काळात या राशीच्या लोकांच्या बिझनेस डील पूर्ण होऊ शकतात. तुम्ही घर आणि वाहन खरेदी करू शकता. तुम्हाला सन्मान आणि प्रतिष्ठा देखील मिळण्याची शक्यता आहे. अविवाहित लोकांना यावेळी लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात.

(हे ही वाचा : ७० वर्षांनी श्रावणात दुर्मिळ योग; भोलेनाथांच्या कृपेने ‘या’ राशींचे आयुष्य होईल गोड, अचानक धनलाभाची संधी? तुमची रास आहे यात?)

वृश्चिक राशी

शनी देवाच्या कृपेने वृश्चिक राशीच्या लोकांना या काळात नशिबाची पूर्ण साथ मिळण्याची शक्यता आहे. नोकरी आणि व्यवसायाशी संबंधित लोकांची आर्थिक स्थिती सुधारू शकते. व्यापारात मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसेही परत मिळू शकतात. या राशीच्या लोकांची त्यांच्या करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे. शनिदेवाच्या कृपेने अचानक मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. या काळात आयुष्यातील अनेक संकटं दूर होऊ शकतात. 

कुंभ राशी

कुंभ राशीच्या लोकांना शनिदेवाच्या कृपेने सुखाचे दिवस पाहायला मिळू शकतात. प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकतो. तुमच्या कामाच्या ठिकाणीही लाभ मिळण्याची शक्यता आहे. अनेक दिवसांपासून अडकलेले पैसे परत मिळू शकतात. वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ होऊ शकतो. समाजात तुमचा मान-सन्मान वाढू शकतो. तुमचे बँक बॅलन्स वाढून तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण राहण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे चांगले फळ मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक बाजू तुमची भक्कम होण्याची शक्यता आहे. 

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saturn enters in purva bhadrapada nakshatra these zodiac sing can get huge money pdb