Tirgrahi Yog: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह वेळोवेळी राशी व नक्षत्र परिवर्तन करत असतो.  प्रत्येक ग्रहाचा भ्रमंती काळ वेगवेगळा असतो. त्याला ग्रह गोचर म्हणतात. एखाद्या राशीत एकापेक्षा जास्त ग्रह येतात. त्यामुळे काही शुभ-अशुभ योग तयार होतात. ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रहाची स्थिती बरंच काही सांगून जाते. त्यामुळे ग्रह कोणत्या स्थानात कसा फळ देतो हे पाहणं महत्त्वाचं ठरतं. ज्योतिषशास्त्रानुसार, शनिदेवाने ३० वर्षांनी आपल्या स्वराशी कुंभ राशीत प्रवेश केलाय. तर येत्या फेब्रुवारीला सूर्यदेव कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत. तर ७ मार्चला शुक्रदेव कुंभ राशीत गोचर करणार आहेत. अशा स्थितीत कुंभ राशीत शनिदेव, सूर्यदेव आणि शुक्रदेव यांचा ‘त्रिग्रही योग’ निर्माण होणार आहे. हा त्रिग्रही योग जुळून आल्याने काही राशींच्या आयुष्यात धनवर्षाव होण्याची शक्यता आहे. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत या नशिबवान राशी…

‘या’ ३ राशी अचानक होणार मालामाल?

मेष राशी (Aries Zodiac) 

त्रिग्रही योग मेष राशीच्या लोकांसाठी अतिशय शुभ ठरु शकतो. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात. या लोकांना आर्थिक आणि करिअरमध्ये उंच शिखर गाठता येऊ शकतात. रोजगाराच्या नवीन संधी या काळात उपलब्ध होऊ शकतात. तुम्हाला भरपूर पैसा मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला शेअर बाजार, लॉटरीमध्ये पैसे गुंतवणे फायदेशीर ठरु शकते. सोन्यात गुंतवणूक करणे फायदेशीर ठरु शकते. या राशीतील ज्या लोकांचे कोर्ट कचेरीचे प्रकरण सुरू आहे त्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

(हे ही वाचा : ५०० वर्षांनी ‘नवपंचम राजयोग’ बनल्याने पैशाच्या बाबतीत अत्यंत भाग्यवान ठरतील ‘या’ राशी? गडगंज श्रीमंती कोणाच्या नशिबात?)

वृषभ राशी (Taurus Zodiac) 

त्रिग्रही योग वृषभ राशीच्या लोकांसाठी वरदानच ठरु शकते. तुम्हाला या काळात तुमच्या नशिबाची पूर्ण साथ मिळण्याची शक्यता आहे. प्रत्येक कामात यश मिळण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांना नोकरीत बढतीच्या नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होऊ शकतो. या काळात तुम्ही नवीन वाहन किंवा मालमत्ता देखील खरेदी करू शकता. आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांच्या जीवनात सुख-समृद्धी लाभण्याची शक्यता आहे.

मकर राशी (Capricorn Zodiac)

त्रिग्रही योगामुळे मकर राशीच्या लोकांना फायदा होण्याची शक्यता आहे. तुमच्या व्यवसायाला गती मिळू शकते. व्यावसायिकांना यावेळी चांगला आर्थिक लाभ होऊ शकतो. मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढून आणि तुमचा सन्मान होण्याची शक्यता आहे. तुमच्या बँक बॅलन्समध्येही चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. हा योग बनल्याने कुटुंबातील वातावरण आनंदी राहण्याची शक्यता आहे. तुम्ही कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. 

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)