Shani And Chandra Yuti 2025 : ज्योतिष पंचांगानुसार, ग्रह एका विशिष्ट काळात भ्रमण करतात आणि मग त्यानुसार शुभ, अशुभ योग निर्माण होतात; ज्याचा व्यापक परिणाम मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर दिसून येतो. सध्या शनिदेव मीन राशीत भ्रमण करत आहेत आणि चंद्र देव १२ ऑगस्ट रोजी मीन राशीत भ्रमण करतील. ज्यामुळे चंद्र आणि शनिदेव यांची कुंभ राशीत युती होईल. ज्यामुळे ‘विष योग’ तयार होणार आहे. ज्यामुळे काही राशींच्या आयुष्यातील समस्या वाढू शकतात. चला जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत…
मेष (Aries)
विष योग तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. कारण – हा योग तुमच्या राशीपासून १२ व्या स्थानावर असणार आहे. त्यामुळे या काळात अनावश्यक खर्चामुळे तुमचे बजेट बिघडेल, नशिबाची फारशी साथ मिळणार नाही. त्याचबरोबर भागीदारीत काम करणाऱ्यांना नुकसान होऊ शकते. कामाच्या ठिकाणी निष्काळजीपणा टाळा; नाहीतर त्रास होऊ शकतो. तसेच, यावेळी तुमच्यावर खोटे आरोप किंवा तुमचे आरोग्यही बिघडू शकते.
मीन (Pisces)
विष योग तुमच्या राशीच्या गोचर कुंडलीत लग्नस्थानी विराजमान असणार आहे. त्यामुळे या काळात नोकरी करणाऱ्या लोकांचे कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी एखाद्या गोष्टीवरून मतभेद होऊ शकतात. त्याच वेळी, यावेळी तुमच्या जोडीदाराबरोबर काही तणाव होऊ शकतात. त्यामुळे वेळीच वाद टाळा. तसेच या काळात तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्याही जाणवू शकतात.
सिंह (Leo)
तुमच्यासाठी विष योग प्रतिकूल ठरू शकतो. कारण हा योग तुमच्या राशीच्या आठव्या भावात तयार होत आहे. त्यामुळे, यावेळी तुम्हाला काही गुप्त आजाराचा सामना करावा लागेल तर अनेक जणांना नोकरी करताना काही समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. कामात काही अडथळे, भागीदारीच्या कामात नुकसान आणि तुम्हाला मानसिक ताण येऊ शकतो.